सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
by जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग
Page 534 of 611
Read in context४८८ सार्थ तुकारामगाथा सैर जाये पडे तयेसी साकडें । सांभाळीत पुढें मागें आस १ ॥ ५ ॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे । लडिवाळ तान्हे विठाईचे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळली-देत राहिली, चोसगा-कासेस, वोरस-स्नेहपूरित पान्हा, तनु-शरीर, सैर- हवा तसा, वाकडा तिकडा अर्थ - ही आमची विठाई माउली शीतळ अशा छायेप्रमाणे असून ती प्रेमाचा पान्हा देत राहिलेली आहे १ मी तिच्या कासेत तोंड खुपसून इच्छेस येईल त्याप्रमाणे मी तिच्या प्रेमाचा पान्हा चारीन, इच्छेस येईल तितके तिचे कृपामृत पीत राहीन २ ही विठाई माउली मोठ्या कृपेने दुधाचा पाटा सोडून माझ्या शरीराचा सांभाळ करिते तिच्यामुळे अमृताचे सजीवनौघ निर्माण झालेली आहे ३ या कृपेमुळे माझ्या चित्तात आनंदास एवढे भरते आले आहे की, आणखी आनंदाला आता स्थानच उरलेले नाही या आनंदाच्या उधाणास सागराचीसुद्धा उपमा कशी पुरो पडेल ? ४ मी जर येडावाकडा चालू लागलो तर, या आईसच त्याचे सकट पडते माझ्या मागेपुढे राहून ती माझे रक्षण एकसारखे करीत असते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे मला चिंता कशी माहीत नाही मी या विठाई माउलीचे लडिवाळ असे तान्हे मूलच आहे ६ रामचरित्र—अभंग १४ १०९५ रामा वनवास । तेणे वसे २ सर्व देश ॥ १ ॥ केले नामाचे जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ २ ॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ऋषिनेम । ऐसा कळोनि का भ्रम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ऋषिनेम-वाल्मीकी ऋषींनी सांगितल्याप्रमाण अर्थ - श्रीरामचंद्राला वनवास घडला म्हणूनच दंडकारण्यात वसती वाढण्यास मदत झाली १ रामचंद्रांनी आपल्या नावाचे सार्थक केले त्याच्याखेरीज समर्थपणा असा स्वतंत्र नाही २ स्वत ची पत्नी सीतादेवी हिला रावणाने नेल्यावर शोकाने व्याकुळ होऊन रामचंद्रही शोकाने वनात रडत होते, असे पुराणांनी वर्णन केले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, वाल्मीकी ऋषींनी जसे लिहून ठेविले होते, तसेच रामचंद्राचे वर्तन झाले असे समजत असूनही तुमच्या मनात संभ्रम कशासाठी आहे ? ४ १०९६ राम म्हणे ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥ १ ॥ धन्य धन्य ते शरीर । तीर्थाव्रताचे माहेर ॥ २ ॥ राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥ ३ ॥ राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउली ॥ ४ ॥ राम म्हणे भोगीं त्यागी । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥ ५ ॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - ग्रासोग्रासी-प्रत्येक घास घेताना अर्थ - जेवताना प्रत्येक घासाच्या वेळी रामनाम जर घेतले तर, त्याला उपवासाचेच पुण्य लाभते १ त्याच्या शरीरास तीर्थांचे व व्रतांचे माहेरघर होण्याचे भाग्य लाभते, तो धन्यधन्य होय २ रोजचा व्यवसाय करीत असताना राम राम असे नाम जर आपल्या मुखामधून येत राहिले तर समाधीचेच सुख आपणास मिळेल ३ वाटचाल करताना प्रत्येक पावलागणिक नामाचे उच्चारिले तर, यज्ञयाग केल्याचे श्रेय मिळेल ४ कोणत्याही १ अस, २ असे