सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 355, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३२१ होते २ ज्या ठिकाणी कीर्तनात श्रीहरीच्या नावाचा घोष होतो, श्रीहरीचे दास मुक्त मनाने नामघोष करीत असतात, तेथे सर्व रसांची प्राप्ती होत असते संसारबंधनाचे पाश तेथे तुटलेले असतात ३ एकदा मनात देवाने स्थान धारण केले आहे असे झाले की, मग ज्ञानाची सर्व लक्षणे प्रकट होतात सर्व गुण आपण होऊन प्रकट होतात मग त्याचे जाणेयेणेही थांबते ४ या प्राप्तीसाठी मग स्वतःचा आश्रमधर्म सोडण्याची जरूरी नाही दुसरे काही श्रम करण्याची आवश्यकता नाही एक विठोबाचे नामस्मरण पुरे आहे ५ हा नारायण साक्षात वेदपुरुषच आहे हेच योगी लोकांचे शून्य ब्रह्म हाच मुक्त व परिपूर्ण असा आत्मा आहे तुकाराम महाराज म्हणतात, परंतु आमच्या- सारख्या भोळ्याभाबड्या लोकांना हे सगुण रूपच पुरे आहे ६ विवरण - बुवांचा हा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे सर्वसामान्य लोकांना योगादी साधनांपेक्षा सगुणभक्तीचा व नामसंकीर्तनाचा मार्ग हाच सहजसुलभ व निर्धोक असल्याचा निर्देश अनेक ठिकाणी आहे ईश्वर- प्राप्तीसाठी संसार मोडायला हवा, रानावनात जायला हवे, आश्रमधर्माचे रीतीरिवाज सांडायला हवेत, कुळधर्म सांडायला हवेत, असे नाही ह्या सर्व प्रापंचिक कार्यात मग्न असताना अखंड नाम प्रभूचे चित्तात असावे व सगुणाचे ध्यान मनात ठसावे मग इतर खडतर साधनांची तुकारामबुवांच्या मते जरूरी नाही 'नलगे सायास जाणे वनांतरा । सुखें येतो घरां नारायण' अशीच ग्वाही तुकाराम महाराजांनी दिलेली आहे 'आता गृहादिक आपुलें । ते कांहीं न लगे त्याजावे । जें घेतें झाले स्वभावें । निसंग म्हणूनि' असे ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे याचे मुख्य मर्म असे की, घरी प्रपंचात राहून सुख भोगणारे जे मन व स्वभावत च नि मग होऊन केवळ हरिरूप झालेले असते नामसंकीर्तन व सगुणभक्ती यांनी ते केवळ ईश्वराशीच निगडित झालेले असल्यामुळे या भक्तास अव्यक्ताची उपासना करण्यासाठी निर्गुणाकडे, योगमार्गाकडे जाण्याची जरूरी नाही ६४६ श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगद्व्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥ १ ॥ सकळदेवा¹ आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ २ ॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥ ३ ॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥ ४ ॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥ ५ ॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हेचि करीतसे विनवणी । भयबंधनीं सोडवावे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - जगद्व्यापका-जग व्यापून राहिलेल्या, करुणाकरा-करुणेच्या सागरा, क्षिती-पृथ्वी, ठाव-आश्रय अर्थ - श्रीअनंत स्वरूपाच्या देवा, मधू नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या देवा, ज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे अशा पद्मनाभा, नारायणा, जगात व्यापून राहिलेल्या जनार्दना, तू अविनाशी आहेस, तू आनंदाचा व कृपेचा मेघ आहेस १ सगळ्या देवांचा देव तू आहेस तू कृपाळू असा केशव आहेस महान आनंद देणारा तू असून तुझ्या संगतीचा श्रेष्ठ अनुभव देणारा तू आहेस सदाशिवा, तू नेहमीच कल्याण करणारा असून तुझे हे रूप सहज १ सकळ देवाधिदेवा तु गाथा ४१