सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 43, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १७ कौतुक करावे असे तिला वाटते ही सुखासीन स्त्री सदोदित आपल्या पतीच्या मागे भुणभुण लावीत असते मला भूक लागत नाही, अन्न पचत नाही, पोट दुखते, कपाळ दुखते, दोन प्रहरी जीव घाबरा होतो, झोप येत नाही, हाडे गळून गेली आहेत या तक्रारी ही लाडावलेली स्त्री नेहमी करीत असते, आणि तिच्या सौंदर्याने मोहित झालेला नवरा 'हो हो खरेच आहे' अशी कबुली देत असतो असल्या ढोंगी व मतलबी बायकोच्या नादाने बिघडलेला नवरा हा या जन्मी गाढवाच्या बरोबरीचाच असतो व पुढल्या जन्मी नरकात जातो कारण लाडावलेल्या बायकोस सुधारण्याचे काम खरे म्हणजे पतीचे पण हा तर तिच्याच तंत्राने वागतो तिथे हे सर्व दोष आहे कारण पायलीभर गहू तिला रोज लागतात, साडेदहा शेर साखर तिला एका आठवड्याची लागते दूधभात व तूपसाखर तिला पथ्यासाठी लागतात हे पदार्थ तुकारामबुवांचे हे बोलणे उपरोधाचे असले तरी प्रापंचिकांना त्यांच्या स्थितीचे नीट वर्णन करून सांगणारे आहे समाजस्थितीचे किंवा समकालीन लोकांच्या प्रवृत्ताचे उपरोधिक वर्णन विनोदी भाषेत बुवा नेहमीच करतात नुसत्या उपदेशापेक्षा उपरोधिक टीकेने अधिक चांगले कार्य होते हे त्यांनाही माहित होते असे दिसते प्रपंचातील अनेक विषयावर भारुडात्मक रचना संतांनी जी विपुल प्रमाणात केलेली आहे तीत हा उपरोध प्रकर्षाने पाहावयास मिळतो मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे दोष घालवून त्याला सन्मार्गास प्रवृत्त करण्याचे कार्य संतांना साधावयाचे होते एकनाथांनी या प्रकारच्या सांसारिक चित्राची अनेक शब्दचित्रे काढली आहेत 'बाई मी भोळी ग बाई मी भोळी । आठा दिसा खाते पुरणाची पोळी' या ओळीने सुरुवात असणारे एकनाथांचे एक चांगले भारुड- गीत प्रसिद्ध आहे अशा प्रकारे संसारात स्त्री व पुरुष याचे लक्ष केवळ अर्थकामावर कसे असते व त्यामुळे संसार कसा बिघडून जातो याची तुकारामबुवांची अभंगात्मक चित्रे विचारप्रवृत्त करणारी आहेत पुढे 'भ्रतारेंसी भार्या बोले गुजगोष्टी', 'कामाचा अंकित कांतलें प्रपंचित' यासारख्या अभंगातून हे प्रपंचदर्शन आपणास होणार आहेच तुकाराम- बुवांची प्रपंचविषयक मते यासारख्या अभंगावरून अजमावताना फार सावध असावयास हवे स्त्रीजातीसबंधी तुकारामबुवांचीही दृष्टी अनुदारपणाची होती असा आक्षेप वारंवार येतो, पण तो खरा नाही केवळ प्रपंच, केवळ धनलोभ, केवळ स्त्री व मुले यांच्याच नादात असणाऱ्याचा गौरव कोण करणार? प्रपंचाचे वा स्त्रीपुरुषाच्या प्रेमाचे रहस्य बुवांना समजत नव्हते असे नाही, परंतु त्यातील ढोंग, त्यातील लोभी वृत्ती, त्यातील ईश्वरविन्मुखता बुवांना दूर करावयाची होती ३७ पावले पावले तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥ १ ॥ जेथें तेथें देखों तुझींच पावले । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ २ ॥ भेदाभेदमते भ्रमाचे सवाद । आम्हा नको वाद त्याशीं देऊं ॥ ३ ॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥ शब्दार्थ व टीपा - पावले - मिळाले, दुजा - दुसरा, याहून वेगळा, सचले - माठून राहिले, भेदाभेदमते - नाना मताचे प्रतिपादन, भेद-अभेद, द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण असे वाद, भ्रमाचे - भ्रममूलक, सवाद - भाषण, वाद - भांडण, कलह, अणु - अगदी लहान कण, नभाहूनि - आकाशापेक्षा, वाढ - मोठा अर्थ - परमेश्वरा, तुमच्यापासून जे काही मला मिळायचे होते ते सर्व मिळाले आहे आता देवा, मागणे एवढेच की मनातील हा भाव बदलू देऊ नका १ विठ्ठला, जेथे मी पाहतो तिथे तुझीच पावले मला दिसतात या त्रिभुवनात तूच भरून राहिलेला आहेस २ भेद, अभेद, द्वैत, अद्वैत हे सर्व भाषण भ्रमातून निर्माण झाले असल्याने त्याच्याशी वाद घालण्याचा किंवा भांडण करण्याचा प्रसंग मजवर आणू नकोस ३ देवा, एखादा अणूही असा नाही की ज्यात तू नाहीस तू अणूपेक्षाही लहान व आकाशापेक्षाही मोठा आहेस ४