सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 438, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंकांहींच नाठवे । ठायीं बैसलें नुठये ॥ ३ ॥ जीव असतां पाही । तुका ठकावला ठायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा, कलिवरेंसीं-शरीर तेवढे, नुठये-न उठवे, उठवत नाही, ठकावला- फसला गेला. अर्थ :- देवा, मला तुमच्या दर्शनाचीच तेवढी तीव्र इच्छा आहे. आता या बाबतीतील उदासीनता मला सहन होणार नाही. १ माझा सारा जीव देवा, तुमच्या पायाशी असून येथे शरीर तेवढे शिल्लक राहिलेले आहे. २ मला आता दुसरे काहीच आठवत नसून बसल्या जागेवरून उठवतही नाही. ३ देवा, तुमच्या चरणांवर मी माझा जीव पाहिलेला असतानासुद्धा मी असा फसवला जावा ना ? ४ ८५६ भोगावरि आम्हीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥ १ ॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं वळा येऊं आतां ॥ २ ॥ काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥ ३ ॥ केला तरी उरे वादचि कोरडा । वळें घ्यावी पीडा स्वप्नींची ॥ ४ ॥ अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीर्दी¹ ॥ ५ ॥ तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाण-प्रकार, रोजकीर्द-रोजच्या जमाखर्चाची वही अर्थ :- देहासंबंधी असणाऱ्या सुखदुःखादी भोगावर आम्ही पाषाण घालून ते जणू सर्व बदच केले आहेत, आणि मरण देहाला व इंद्रियांच्या वृत्तींना असते हे जाणून मी आत्मतत्त्वाच्या जाणिवेमुळे अमर होऊन राहिलो. अशा प्रकारे मरणालाच मी मारून टाकले आहे. १ देवा, सर्व विश्वाला जर तू भरून राहिला असशील तर मी त्यातून निराळा कसा राहू शकेन ? मग मी वेगळा मानून उगाच कोणत्या वळाने माडून काढू ? २ सर्वत्र तूच आत व बाहेर जर भरून राहिला असशील, तर मग मी आतून बाहेर तरी काय काढावे ? व बाहेरून आत तरी काय ठेवावे ? ३ याविषयी वादही किती जरी केला तरी तो कोरडाच राहतो. असे असल्याने देहादींची व इंद्रियांची दुःखे ही स्वप्नवत असल्याने ती घेण्याची किंवा खरी मानून कष्टी होण्याची यातायाात मी का करावी ? ४ देवा, सर्व प्रकार तुमच्या घरीच आले असताना, सर्व मजुरांची मजुरी रोजच्या जमाखर्चाच्या वहीत आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, यात मी लाभहानी काही जाणणार नाही. या देहाचा जो कोणी धनी असेल तो या देहाचा वाडा रक्षण करील. ६ ८५७ कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥ १ ॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें फोडें उपजलें ॥ २ ॥ कां हो उपजेना द्यावी ऐसी भेटी । काय ह्रींत पोटां धरिले देवा ॥ ३ ॥ पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाही आतां ॥ ४ ॥ काय जाले देणें² निघाले दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणियांनीं ॥ ५ ॥ तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडूनियां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -नाड-अडथळा, साकडे-सकट, फोडें-अडचण. अर्थ - देवा, तुमच्या व माझ्या भेटीत आड येणारा काळ का हो मध्येच आला ? त्याने तुमच्याजवळ येऊन अडथळा का हो निर्माण केला ? १ मला भेट देण्याविषयीच्या विचाराचे सकट तुम्हांस का पडले आहे ? अशी कोणती अडचण निर्माण झाली आहे की, तुम्ही भेट देण्याचा विचार रहित केला ? २ देवा, मला भेट द्यावी अशी भावना १ कीर्ती, २ नेणे