सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 49, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २३ देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥ ३ ॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुम्हाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देहभोग-देहास होणारे सुखदुःखादी विकार अर्थ :- आमची कोणी निंदा करोत अथवा कोणी स्तुती करोत, कोणी मार देवोत अथवा कोणी पूजा करोत, १ मला पहिल्याचे दुःख नाही दुसऱ्याचे सुख नाही. मी सुखदुःखान्याहोपेक्षा निरच्छाच आहे. २ देहभोगानुसार जे जे बरेवाईट प्रसंग येतील ते सर्व सारख्याच दृष्टीने मी भोगीन. त्याचे समत्वाने स्वागतच करीन ३ कारण ही सर्वच सुखदुःखे माझी स्वतःची नसून जनार्दन स्वरूपाच्या नारायणास ती मी अर्पण केली आहेत, मी तसा अलिप्तच राहिलो आहे. ४ विवरण - वरील दोन्ही अभंगात भक्ताच्या उदासीन वृत्तीचे रहस्य फार समर्पक रीतीने वर्णन केले आहे. त्याने आपले सर्व भाव व सर्व क्रिया सर्वज्ञ परमेश्वरास अर्पण केले असल्याने तो त्यात गुंतून राहात नाही, त्या मानअपमान, सुखदुःख याच्या पलिकडे असतो स्तुतिनिंदा त्याला सारखीच असते भगवद्गीतेच्या बाराव्या अध्या- यात 'यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी' (जो कशाचाही आनंद मानीत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही, समचि शुभाशुभ फलही ज्याच्या मनात नसते) अशा भक्ताचा गौरव केला आहे त्याची वागणूक 'तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी' (निंदास्तुती समान मानणारी) असते सर्व साधुसंतांनी हाच बोध आपल्या आचरणातून व्यक्त केला आहे 'निंदा स्तुति कोणी करो दया माया । न धरीं चाड या सुखदुःखा' असे तुकारामबुवांनीही म्हटले आहे ४९ जन विजन जालें आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणे ॥ १ ॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ २ ॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥ ३ ॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विजन-एकान्ताची जागा, पट्टण-शहर, सरता झाला-सारखा झाला, विठ्ठल् रूपाने भरून राहिला अर्थ :- एका विठ्ठलनामामुळे आम्हास जनसमुदायात राहून विजनवासाची, एकान्ताची गोडी मिळाली १ जिकडे आम्ही पाहू तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाईचीच रूपे आम्हास दिसतात २ वन असो अथवा नगर असो विठ्ठलवासामुळे सर्व ठिकाणे आम्हास सारखीच झाली ३ या अद्वितीय अशा समभावाच्या आनंदात आम्हाला सुख- दुःखाची आठवणही होत नाही; तुकाराम महाराज त्याच कौतुकाने नाचत आहेत. ४ विवरण-या अभंगात परमेश्वरी कृपेने भाग्यवान झालेल्या भक्ताची अवस्था समत्वाची कशी होते याचे उत्कृष्ट चित्रण आले आहे सर्वत्र विठ्ठलभावच प्रतीतीस आल्यामुळे सुखदुःख, स्तुति-निंदा याची भावना नष्ट झाली जनात आहोत की विजनात आहोत हेही आमच्या ध्यानात येत नाही असे बुवा सांगत आहेत या ठिकाणी 'जन विजन जाले आम्हा' या शब्दातील रहस्य समजावून घ्यावयास हवे जनसमुदाय व वननिवास ही स्थिती आम्हास समान वाटते म्हणजे वनातील एकान्त गर्दीप्रमाणे वाटतो, असे नसून शहरातील जनसमुदायातही एकान्ताचा अनुभव येण्याइतपत आमची विठ्ठलाशी तद्रूपता झाली आहे असा भावार्थ या विजनवासाचे, एकान्ताचे, वननिवासाचे महत्त्व साधकाच्या आयुष्यात फार मोठे आहे 'अरतिर्जनसंसदि' सर्वसामान्य जनांच्या समूहाची आवड नसणे हे एक आत्मज्ञानी माणसाचे लक्षण गीतेत सांगितले आहे हा आत्मज्ञानी 'विविक्त सेवी' म्हणजे विशिष्ट अशा एका- न्ताच्या स्थळी राहाणारा असतो 'एकान्तेवीण प्राणियांतें बुद्धि कैंची ?' म्हणून समर्थांनीही विचारले आहे यासाठी तुकारामबुवांनी गावातील गजबजाट सोडून भंडाऱ्याच्या डोंगरावरील वृक्षवल्लीच्या व वनचरांच्या सोबत्यात मन रमविले हा एकान्ताचा निवास बुवांच्या मनास फार रुचला येथे आपल्याच मनाशी आपणच संवाद