सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 522, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंगणतीचे एक उच निंच फार । तयामध्यें शूर विरळा थोडे ॥ ४ ॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्याचा मान । पाईक पाहोनि मोल करी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - ओळी-प्रकार, गांडे-भिव, वळी-बलवान, कुचर-कुचराई करणारे अर्थ - या सेवकांचे श्रेष्ठ व कनिष्ठ असे प्रकार कसे असतात ते पाहा. कुणी भित्रे असतात कुणी शूर व बलवान असतात १ कुणी आपल्या स्वामीच्या सेवेत तत्पर असतात, तर कुणी त्याविषयी कुचराई करतात नुसतेच आशेने धड असतात २ शौर्य दाखविण्याचा प्रसंग आल्याशिवायच ते वृथा शूरत्वाचा खोटा आविर्भाव आणतात व आपण सेवक आहोत, अशी विनाकारण ऐट मिरवितात ३ या सेवकाची गणतीच करायला गेले तर, खरा व प्रामा- णिक असा सेवक एखादाच मिळतो खालच्या दर्जाचेच सेवक फार असतात त्याच्यात शूर असे वीर सेवक क्वचितच आढळून येतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा शूर सेवकाचा मान त्याचा स्वामी जाणीत असतोच त्याच्या सेवेप्रमाणेच त्याचा स्वामी त्याचे मोल यथायोग्य करीत असतो ५ १०७० एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥ १ ॥ स्वामिपदीं एका ठाव उच स्थळीं । एक तों निराळीं जवळी दुरी ॥ २ ॥ हीन कमाईचा हीन आन ठाव¹ । उचा सर्व भाव उच पद ॥ ३ ॥ पाईकपणे तो सर्वन सरता । चांग तरी परता गाडचा ठाव ॥ ४ ॥ तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेने अयफळा अभयें मोल ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भेनें-भीतीने अर्थ - एकाच स्वामीचे सब पाईक असले तरी त्याच्यात ज्याचे जसे बळ असेल तसे त्याचे मोल ठरते १ जे खरे, सच्चा दिलाचे असतात, शूर व प्रामाणिक असतात, त्याना स्वामीजवळच उचावर आसन मिळते व दुसरे कुणी कमी प्रतीचे असतात, त्याना स्वामीच्या आसपास कुठे तरी दूरच्या ठिकाणी जागा मिळत असते २ ज्याचे कर्तृत्व कमी प्रतीचे असते, त्याना स्थानही खालच्या दर्जाचे मिळते उलट ज्याचे शौर्य श्रेष्ठ दर्जाचे असते, त्याला मानाचे स्थानही फार उचीचे मिळते ३ तो सेवक आपल्या सेवेने सर्वांना प्रिय झालेला असतो, परंतु एखादा चांगला असूनही जर कुचराई करील, तर मात्र तो भित्राच ठरतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मरण तर सर्वांनाच आहे पण मरणाचे भय धारण केल्यास अप्रतिष्ठा होते व अभय धरल्यास जीवितास मोल चढते ५ १०७१ प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाठीं एके जैशीं तैशीं ॥ १ ॥ आगळें पाऊल आणिकासी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ २ ॥ पाठीवरी घाय² म्हणती फटमर । धडा अग्रें शूर मान पाये ॥ ३ ॥ घेईल दरवाडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥ ४ ॥ तुका म्हणे नव्हे बोलाचे कारण । कमाईचा पण सिद्धी पाये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रजी-प्रजेच्या सुखासाठी फटमर-भ्याड अर्थ - प्रजेच्या सुखासाठी मरण पत्करणारा जो सेवक असतो, तोच नाईकाच्या पोरवीस पोचतो आणि केवळ पोटासाठी लढणारे असतात, त्याना मानही जशास तसा असाच जमतेम मिळतो १ कित्येकजण शत्रूवर चाल करून वेगळेच पाऊल टाकतात, तर कित्येक शत्रूच्या भीतीने माघारी वळून पळत असतात, त्याचे मात्र पाय तुटले जातात २ शत्रूचे घाय पाठीवर घेऊन जे पळून येतात ते शिपाईगडी भ्याडच म्हणावेत व जे धड अगाने शत्रूवर समोर होऊन चालून जातात, त्याचाच मान सवत्र असतो ३ आपल्या जीवावर उदार होऊन जो पाईक शत्रूवर १ धाव, २ धाव