सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 530, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंवाढला म्हणजे विनाकारण अंतर निर्माण होते, म्हणून देवा, पोटात कधी कपट ठेवू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, तू स्वतः जाणता आहेस पण मला मात्र व्यवहारातील बोलणे करायला उगाच लावतोस ४ १०८६ मूळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥ १ ॥ घ्यावे त्याचे देणेचि नाहीं । येचि वाहीं देखतसो ॥ २ ॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांठीची लंगोटी सोडिस ना ॥ ३ ॥ तुका म्हणे म्या सांडिली आशा । हुगिला फांसा येथुनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाहीं-प्रवाह, ओघ, रीत अर्थ - देवा, तुम्हांला मूळचीच सवय लागली आहे, ती काही तुम्ही सोडीत नाही. १ ज्याचे तुम्ही एकदा घेता, ते कधी परत देतच नाही हाचं प्रवाह तुमच्या येथील मी पाहात आहे २ तू माझी भली मोठी घोंगडी घेतलींस तेवढी, पण स्वतःची लंगोटीसुद्धा देत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर आता आशाच सोडली आहे अशा प्रकारचा पाश मी हुसून टाकून दिलेला आहे ४ १०८७ घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥ १ ॥ हा गे चोर घरा धावा कोणी । घरात राहाटे चहू कोनी ॥ २ ॥ नोळखवे म्या धरिला हातीं । देहा दीप माय लाविली वाती ॥ ३ ॥ न पावे धावणे मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साटी केली-सोडून दिला, राहाटे-फिरता आहे अर्थ - या देवाने माझ्या घोंगड्यासच मिठी मारली आहे हो जीव गेला माझा तरी तो आता सोडणार नाही १ लोकांहो, हा एक चोरच माझ्या घरात शिरून चारही कोपऱ्यातून फिरतो आहे धावा हो धावा याला कुणी तरी धरा हो २ मी माझ्या देहाचा दीप मायची वात करून प्रज्वलित केला आहे, तरी मी त्याला काही ओळखू शकत नाही त्याला हातात मात्र पकडून ठेविले आहे ३ हा तुकाराम यामुळे लोकव्यवहारदृष्टीने नागवला जात असून, रक्षणासाठी लोकांना हाक मारीत असून त्याच्या मदतीसाठी कोणीही धावून येत नाहीत ४ १०८८ आता मी देवा पांघरो काई । भिकेचे तेही उरेचि ना ॥ १ ॥ सदैव दुबळें नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ २ ॥ नाही मजपाशीं फुटकी फोडी । पाचांनीं घोंगडी दिली होती ॥ ३ ॥ तुका म्हणे जना वेगळें जाले । एकचि नेले एकल्याचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सदैव-गुर्देवीं श्रीमान, सुनाट-उघडे फोडी-कवडी, सुपारीचे खांड, पाचांनी- पंचमहाभूतांनी अर्थ - देवा, आता मी पांघरू तरी काय रे ? एक घोंगडी मी भिक्षा मागून आणली होती, तीही तू नेलीस आता माझ्यापाशी काहीच उरले नाही १ चोर चोरी करताना श्रीमान, सुदैवी अथवा दरिद्री, दुबळा असा फरक कधीच करीत नाही घर उघडे पाहिले की तो फोडतो व चोरी करून निघून जातो तसेच माझे झाले २ माझ्या पाशी तसे पाहिले तर फुटकी कवडीसुद्धा नाही, मला तेवढीच एक पंचमहाभूतांनी देहरूपी घोंगडी दिली होती ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या एका परमेश्वराने माझी एकट्याची घोंगडी नेऊन मला लोकाचारातून वेगळे केले ४ १०८९ मी माझें करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले¹ खाने ॥ १ ॥ मज आल्याविण आधींच होता । मज न कळता मज² माझी ॥ २ ॥ १ घेतली खाण, २ मजपाशी