सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 57, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३१ चमकदार पाण्याचे मोती असेल त्याचा स्वाद चाखण्याचा वेडेपणा करू नये मधुर ध्वनी वाढणारे वाद्य असले तरी ते फोडून त्याचा नाद कधी पाहू नये ३ कर्म देणारी फळे असली तरी फळाची इच्छा धरून कर्म करू नयेत असे मर्म तुकाराम महाराज लोकांना दाखवीत आहेत ४ ६५ माया तेंचि ब्रह्म ब्रह्म तेचि माया । अंग आणि छाया तया परी ॥ १ ॥ तोडिता न तुटे सारिता निराळी । लोटांगणातळीं हारपते ॥ २ ॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥ ३ ॥ तुका म्हणे उंच वाढे उंचपणे । ठेंगणी लवणे जैसीं तैसीं ॥ ४ शब्दार्थ व टीपा - हारपते-नाहीशी होन, लपते, आटी-खटपट, लवणे-वाकणे म्हणज अर्थ -माया आणि ब्रह्म हे दोन नसून एकच आहेत माया तेच ब्रह्म व ब्रह्म तेच माया आहे जसे देह आणि त्याची छाया यांचे ऐक्य असते तसेच ब्रह्म-माया याचेही ऐक्य आहे १ छाया कधी शस्त्राने तोडली तरी निराळी होत नाही, दूर सारली तरी नाहीशी होत नाही, आपण जमिनीवर लोटांगण घातल्यास ती वेगळी न राहता आपल्यातच नाहीशी होते इतकी ती आपल्या देहाशी एकजीव आहे २ ही छाया दुसऱ्या पणाने खरी नाही मग तिच्या स्वतंत्र सिद्धीसाठी बळ कशासाठी खर्च करायचे ? विचारांची खटपट तरी काय म्हणून करावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही छाया नेहमी आपणास अनुसरते आपण उंच झालो की ती उंच होते, आपण जर लवलो तर तीही तशीच लवून राहते देहापासून छाया जशी दूर या वेगळी नाही, तशीच अवस्था ब्रह्म व माया याच्या संबंधाने आहे ४ ६६ दुर्जनासि करी साहे । तो ही लाहे दंड हे ॥ १ ॥ शिंदळीच्या फुटणी वाटा । सग लोटा लोटाचा ॥ २ ॥ येर येरा काचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥ ३ ॥ तुका म्हणे कापू नाके । पुढें आणिके शिकविती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साहे-मदत लाहे-मिळवितो दंड-शिक्षा, काचणी-घासण अर्थ - वाईट लोकाना जे मदत करणारे आहेत त्यांनाही शिक्षाच व्हावयास हवी १ वाईट चालीच्या स्त्रीचा माग कुंटिणीचाच असतो खरे आहे, खोटयाना संगत खोट्याचीच लाभते २ एका पदार्थाची दुसऱ्यावर घषण झाल की त्यातून आग निर्माण व्हायचीच ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुर्जनांचे नाक कापून घ्यावे, कारण ते असाच दुराचार इतरानाही शिकवितात ४ ६७ वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाहीं ॥ १ ॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचे सार लाभ नाहीं ॥ २ ॥ देवपूजेवरी ठेवोनिया मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥ ३ ॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदरे । लाघव हे चार शिंदळीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -वृत्ति-निर्वाहाच साधन, शेतवाडी उपार्जितो-मिळवतात अंतरींचे-आतील सार-मुख्य वस्तू लाघव-मायादा प्रकार चार-दड पाछ अर्थ -निर्वाहाचे साधन म्हणून जे लोक भूमी, राज्य, द्रव्य याची प्राप्ती करून घतात, त्याना देव निश्चित मिळत नाही असे समजा १ भाडेकरी आपल्या पाठीवर केवळ सामानाचे ओझेच वाहतो, त्या ओझ्यातील मुख्य वस्तू काही त्याला मिळत नाही २ एखाद्या विषयाचा लोभ मनात ठेवून जर एखादा देवपूजा करीत असेल तर तोही एका पाषाणापुढेचा दुसरा पाषाणच होय ३ मोठ्या आदराने या प्रमाणे नाना वासना ठेवून लोक कर्म करणारे असतात फलाची आशा ठेवून ज्याची कर्म असतात त्याचे आचार व त्याचे सारे कौतुक, वेश्येप्रमाणेच या गोष्टी असतात ४