छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 11, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंसाम्राज्याची शकले होऊन पाच शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि अहमदनगरची निजामशाही. यापैकी दोन शाही राजवटी स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. उरलेल्या तीन राजवटी पैकी एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी तुर्कस्थानमधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. शेवटच्या दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते. आणि स्थानिक जनतेला त्यांचेविषयी आपुलकी वाटत होती. या पाचही राजवटीत आपापसात संघर्ष करीत राहिल्या आणि अशा या संघर्षमय काळात सोळाव्या शतकाच्या अखेरीस बलाढ्य मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला. तेव्हा आपापसात लढणाऱ्या शाही राजवटींना आणखी एका बलाढ्य शत्रूशी लढा देणे क्रमप्राप्त झाले. आपापले सामर्थ्य वाढविण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदूंची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच महाराष्ट्रात मराठ्यांचा उदय झाला. शाही राज्यकर्त्यांच्या लष्करातही मराठ्यांना स्थान प्राप्त झाले. इ.स. १६२६ मध्ये आदिलशहाने बिदरची बरीदशाही खालसा केली. त्यापूर्वीच इ. स. १५७४ मध्ये मुर्तजा निजामशाह याने वऱ्हाडची इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्यास जोडला होता. अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या. मुघलांशी या राजवटींचे संघर्ष चालू होते. मराठ्यांच्या उदय आणि उत्कर्ष होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली. मराठ्यांचा उदय बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहेच. मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदूंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते. ‘बुरहाने मासीर’ या समकालीन ग्रंथावरून दलपतराय, कान्हु नरसी, साबाजी इत्यादी हिंदु व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकारपदे भूषविली होती असे दिसून येते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी स्थानिक हिंदूंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले. गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते. आदिलशाही शिवपूर्वकाल ५