छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 114, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंशिवाजी महाराजांचे कुटुंब शिवाजी महाराजांनी एकंदर ८ विवाह केले. या ८ राण्यांची नावे पुढीलप्रमाणे :- १) सगुणाबाई, २) सईबाई ३) सोयराबाई, ४) पुतळाबाई, ५) लक्ष्मीबाई, ६) सकवारबाई, ७) काशीबाई आणि ८) गुणवंताबाई. महाराजांना २ मुले होती १) संभाजी २) राजाराम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या ४ राण्या हयात होत्या. संभाजीची आई सईबाई तो केवळ अडीच वर्षांचा असताना मरण पावली. राज्याभिषेक होण्याच्या प्रसंगी पट्टराणी होण्याचा मान सोयराबाईस मिळाला. परंतु युवराज होण्याचा मान संभाजीला मिळाला. त्यातूनच रायगडावर तंटेबखेडे सुरू झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ १ महिन्याने राणी पुतळाबाई सती गेली. शिवाजी महाराजांना ६ मुली होत्या. या सर्व मुलींचे विवाह नामांकित घराण्यातील पुरुषांशी झाले. परंतु शिवाजी महाराजांचा एकही जावई त्यांच्या स्वराज्यकार्यात सहभागी झालेला आढळत नाही. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत म्हणजे जून १६७४ पर्यंत हयात होती. आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊलीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर केवळ १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा पाचाड येथे राहात्या घरात मृत्यू झाला. स्वराज्याचे प्रशासन सभासद बखरीमध्ये असे म्हटले आहे की, 'आपला अंतकाळ जवळ आल्यावर आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी जवळ बोलाविले आणि स्वराज्याचा कारभार पुढे कसा करावा याचे मार्गदर्शन केले.' आपल्या राज्याचा विस्तार सांगताना महाराजांनी असे स्पष्ट केले की, 'राज्य म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पुणे महाल होता, त्यावरि एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले.' स्वराज्यामध्ये समाविष्ट असलेल्या सुभ्यांच्या उत्पन्नाची माहिती देणारा एक शिवकालीन जाबता उपलब्ध आहे. त्यामध्ये स्वराज्यातील सुभ्यांचे एकूण उत्पन्न १,३२,६६,६३५ एवढे दर्शविले आहे. स्वराज्यात मोडणारा प्रदेश एकूण १४ सुभ्यांचा होता. शिवाजीच्या स्वराज्याची भौगोलिक मर्यादा स्पष्ट करताना रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की, 'सालेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादन केले.' साधारणपणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भौगोलिक सीमा पुढीलप्रमाणे सांगता येतील. उत्तरेकडे बागलाण प्रदेश, दक्षिणेकडे नाशिक व पुणे भागातून सातारा आणि कोल्हापूर १०८ छत्रपती शिवाजी महाराज