छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 33, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंशु. ॥ सप्तमी, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्हाच्या वेळी शिवाजी आणि अफझलखान यांची भेट होईल असे ठरविण्यात आले आणि त्यावेळी दोघांजवळ प्रत्येकी दोन सेवक राहतील, प्रत्येकाचे १० अंगरक्षक बाणाच्या टप्प्यापलीकडे उभे रहातील, दोघांनीही सशस्त्र यावे असा तपशील ठरविण्यात आला व तो दोघांनाही मान्य झाला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी मध्यान्हाच्यावेळी अफझलखान प्रतापगडच्या माचीवर येऊन पोहचला. शिवाजीनेही खानाच्या भेटीची तयारी केली. स्वसंरक्षणासाठी त्याने चिलखत आणि शिरस्त्राण घातले. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात कृपाण अशी दोन शस्त्रे शिवाजीने घेतली. जिऊमहाला आणि संभाजी कावजी हे दोन हुद्देकरी बरोबर घेतले. खानाच्या बरोबरही दोन हुद्देकरी होते पण त्याशिवाय सय्यद बंडा हा धारकरीही होता. शिवाजीने हरकत घेतल्यावर सय्यद बंडाला मंडपाबाहेर पाठविण्यात आले. प्रतापगडच्या माचीवर खानासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला होता. या शामियान्यातच शिवाजी व अफझलखान यांची भेट होणार होती. ठरल्याप्रमाणे भर मध्यान्हाच्या वेळी शिवाजीने खानाला भेटण्यासाठी शामियान्यात प्रवेश केला. शिवाजीला पहाताच खानाने आलिंगन देण्यासाठी हात पसरविले. शिवाजी अत्यंत सावधपणे पुढे गेला. खानाने शिवाजीला बाहुपाशात घेऊन त्याचे मस्तक काखेत दाबून धरले. त्यानंतर खानाने शिवाजीच्या डाव्या कुशीत जमदाड (खंजीर) खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु अंगात चिलखत असल्यामुळे तो वार शिवाजीला लागला नाही. यावेळी सावधचित्त असलेल्या शिवाजीने मोठ्या चपळाईने आपली मान सोडवून घेतली आणि आपल्या हातात असलेली कृपाण खानाच्या पोटात खुपसून त्याचा वध केला. खानाच्या सेवकाने शिवाजीवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा वार चुकवून शिवाजीने त्याला ठार मारले. खान पडल्याचे लक्षात येताच सय्यद बंडा हा मोठ्या त्वेषाने धावून आला. पण जीऊमहालाने त्याला मध्येच अडवून ठार केले. खानाचा वध झाल्यावर शिवाजीने किल्ल्यावरून इशारतीच्या तोफा डागल्या. पूर्वनियोजित संकेताप्रमाणे शिवाजीचे सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलमय प्रदेशात विखुरलेले होते. इशारतीचे आवाज येताच शिवाजीच्या सैन्याने खानाच्या सैन्यावर हल्ला केला. कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव, सिलिंबकर देशमुख इ. सरदारांनी अतुल पराक्रम गाजवून खानाच्या सैन्याची अक्षरशः वाताहत केली. अशाप्रकारे अचानक युद्धाला तोंड द्यावे लागेल स्वराज्याचा विस्तार २७