छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 49, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंफार अवघड होईल, याचा अंदाज शिवाजीला आला म्हणून नाइलाजाने शरणागती पत्करून जयसिंगाबरोबर तह करण्याचे त्याने ठरविले. ११ जून १६६५ रोजी शिवाजी आणि जयसिंग यांची भेट झाली. २ दिवस बोलणी करून १३ जून १६६५ रोजी शिवाजी आणि जयसिंग यांच्यात तह झाला. हा तह 'पुरंदरचा तह' म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्या. १. लहानमोठे १२ किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा मुलूख एवढ्यावर शिवाजीने संतुष्ट राहावे. बादशहाची अवज्ञा अगर बादशाही मुलुखाची लूट करू नये. २. शिवाजीचे २३ किल्ले आणि बालाघाट आणि निजामशाही तळकोकण मिळून चार लाख होनांचा मुलूख शिवाजीकडून घेऊन मोगली साम्राज्याला जोडण्यात यावा. ३. दख्खनच्या सुभ्याच्या अमलात हुकूम होईल तेव्हा शिवाजीने कामगिरीवर हजर व्हावे. ४. पाच हजार स्वारांची मनसब घेऊन संभाजी आणि 'दुसरा शिवाजी' म्हणून प्रख्यात असलेला नेताजी या उभयतांनी दख्खनच्या सुभेदाराबरोबर राहावे. ५. तळकोकणातील ४ लाख होन उत्पन्नाचा आणि विजापुरी बालाघाटातील ५ लाखांचा मुलूख जर बादशहाने शिवाजीला दिला, आणि विजापूरकरांचा मुलूख जिंकल्यावर ह्या मुलुखाचा ताबा बादशाही फर्मानाने कायम शिवाजीकडे करून दिला, तर मग दरसाल तीन लाखांच्या हप्त्याने शिवाजीने बादशहाला ४० लाखांची खंडणी द्यावी. तहाचे एकूण स्वरूप लक्षात घेतले तर त्या तहामुळे शिवाजीच्या स्वराज्यावर मुघलांची बळकट पकड निर्माण झाली असे दिसून येते. जयसिंगाने तह करण्यापूर्वी या तहाच्या मसुद्यास औरंगजेबाकडून परवानगी मिळवली होती आणि ही परवानगी मिळवताना या तहाचे ३ फायदे जयसिंगाने औरंगजेबाच्या नजरेस आणून दिले होते. एक म्हणजे या तहातील अटींप्रमाणे ४० लाख होन मराठ्यांकडून मिळणारे होते. दुसरा फायदा म्हणजे आदिलशहा आणि शिवाजी यांच्यामधील वैमनस्य वाढणार होते. तिसरा फायदा म्हणजे आदिलशहाच्या ताब्यातील दुर्गम डोंगराळ प्रदेश जिंकून मुघलांना मिळवून देण्याचे काम शिवाजीकडे सोपविले होते. तहाचा साक्षेपाने विचार केल्यास या तहामुळे जयसिंगाची स्वारी ४३