छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 51, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंपुरंदरच्या तहामुळे शिवाजीचे चिमुकले स्वराज्य रौद्र. स्वरूपाच्या संकटात सापडले होते. सप्टेंबर १६६५ मध्ये औरंगजेबाकडून पुरंदरच्या तहाला मान्यता आली. त्याचप्रमाणे औरंगजेबाने शिवाजीसाठी कृपेचे फर्मान आणि पोषाख जयसिंगाकडे पाठविला. २७ सप्टेंबर रोजी शिवाजीने स्वतः जयसिंगाकडे जाऊन कृपेचे फर्मान स्विकारले. शिवाजीसाठी त्याच्या आयुष्याचा हा एक अत्यंत दुर्दैवी क्षण ठरला. पुरंदरचा तह झाल्यानंतर आणि शिवाजीने औरंगजेबाचे फर्मान स्विकारल्यानंतर जयसिंगाने आदिलशाहीविरुद्ध मोहिम हाती घेतली. तहातील अटीप्रमाणे या मोहिमेत जयसिंगाला मदत करण्यासाठी शिवाजी बांधला गेला होता. जयसिंगाने आपल्या नेहमीच्या रणनीतीनुसार आदिलशाहीचे सरदार फोडण्यास सुरुवात केली. कित्येक सरदार आदिलशाही सोडून जयसिंगाला येऊन मिळाले. रुस्तुमजमा या निष्ठावंत सरदाराने मात्र आदिलशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला. नोव्हेंबर १६६५ मध्ये जयसिंगासमवेत शिवाजीही विजापूरच्या मोहिमेवर निघाला. जयसिंग आणि शिवाजी संयुक्तपणे विजापूरवर चालून येत आहे हे पाहून अली आदिलशहा खडबडून जागा झाला. आपले राज्य वाचविण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न करायचे ठरविले. राजधानीच्या रक्षणाची त्याने एवढी कडेकोट तयारी केली की जयसिंग व शिवाजीपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. आत्मरक्षणासाठी आदिलशहाने विजापूरच्या आसमंतात चारी बाजूंनी खडी फौज ठेवली. जयसिंगाच्या मोहिमेला अडथळा यावा म्हणून विजापूरच्या परिसरातील ४-५ मैलांचा टापू स्वतःच उध्वस्त करून टाकला आणि सर्वत्र पाण्यामध्ये वीष पेरून ठेवले अशाप्रकारे विषारी तटबंदी विजापूरच्या आसमंतात उभी केल्यामुळे मुघलांची फौज त्या टापूपर्यंत येणे महाकठीण होते. तशात विजापूर पासून १२ मैल अंतरावर मुघल आणि आदिलशहा यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात मुघलांचा दणदणीत पराभव झाला. त्या लढाईत मुघलांचे चौदा हजार सैन्य गारद झाले असा उल्लेख एका समकालीन पत्रात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत पत्रात शिवाजीनेच मुघलांचा घात केला म्हणून त्यांना अपयश आले असाही उल्लेख आलेला आहे. शिवाजीने दगाफटका करून मुघलांना फसविले असे मात्र घडलेले नाही उलट आपले सर्व सैन्य घेऊन जयसिंगाबरोबर त्याने मोहिम हाती घेतली होती. ताथवड व फलटण ही दोन ठाणीही मुघलांना जिंकून दिली होती. एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे या मोहिमेमध्ये शिवाजीचे मन नव्हते आणि त्याला स्वारस्यही वाटत नव्हते. विजापूर मोहिम फसल्यानंतर शिवाजीने पन्हाळा किल्ला जिंकून घेण्याची जयसिंगाची स्वारी ४५