छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 54, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ें७. शिवाजी आणि औरंगजेब वाढदिवसाचा दरबार १२ मे १६६६ रोजी बादशहा औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आग्रा येथे खास दरबार भरविण्याचे ठरले होते. योगायोग असा की ११ मे १६६६ रोजी शिवाजी मलुकचंदसराई येथे येऊन पोहचला होता. तेथून आग्रा शहर अतिशय जवळ होते. शिवाजी आणि औरंगजेब यांची भेट वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष खास दरबारात घडवून आणावी असा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याचा विचार होता. १२ मे रोजी स्वतः रामसिंग शिवाजीकडे गेला आणि त्याचे स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी ‘दिवाण-इ-आम’ या दरबारात नेण्याचे त्याने ठरविले. परंतु शिवाजी तिथे पोहोचण्याअगोदरच ‘दिवाण-इ-आम’मधील औरंगजेबाचा वाढदिवस समारंभ संपला होता आणि खास अमीर उमराव लोकांसाठी असलेल्या ‘दिवाण-इ-खास’ या दरबारामध्ये औरंगजेब गेला. त्या काळी दिवाण-इ-खास ‘घुसलखाना’ या नावाने प्रसिद्ध होता. घुसलखाना याचा अर्थ स्नानगृह. या शब्दामुळे काही इतिहासकारांचा गैरसमज होऊन औरंगजेब व शिवाजी यांची भेट स्नानगृहात झाली असा हास्यास्पद निष्कर्ष त्यांनी काढलेला आढळतो. दिवाण-इ-खासला घुसलखाना नाव पडण्याचे कारण की सम्राट अकबर स्नान आटोपले की लगेच या दरबारामध्ये हजर होत असे म्हणून दिवाण-इ-खासला रूढ अर्थाने घुसलखाना हे नाव प्राप्त झाले होते. औरंगजेब ‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अमीर उमरावांनी बादशहाच्या जयजयकाराच्या घोषणा केल्या. शिवाजी-औरंगजेब भेट ‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर अमीर उमरावांनी कुर्निसात करून बादशहाला भेटवस्तू अर्पण करण्यास सुरुवात केली. याचवेळी रामसिंग शिवाजी ४८