दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 105, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७० श्रीदासबोध. [ दशक अनुपत्ती कदांन्न । या नांव आधिभौतिक ॥ ८१ ॥ आकांत वाखा प्रळय । युद्धीं होतां पराजय । जिवलगांचा होय क्षय । या नांव आधिभौतिक ॥ ८२ ॥ कठिण काळ आणि दुष्काळ । साशंकै आणि वोखटी वेळ । उद्वेग चिंतेची हळहळ । या नांव आधिभौतिक ॥ ८३ ॥ घाणाचरकीं शिरकला । चाकाखालीं सांपडला । नाना वन्हींत पडियेला । या नांव आधिभौतिक ॥ ८४ ॥ नाना शस्त्रें भेदिला । नाना श्वापदें भक्षिला । नाना बंदीं पडि- येला । या नांव आधिभौतिक ॥ ८५ ॥ नाना कुवासें निर्बुजे । नाना अप- मानें लाजे । नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आधिभौतिक ॥ ८६ ॥ ऐसे सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर । श्रोतीं जाणावा विचार । आधिभौतिकाचा ॥ ८७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके आधिभौतिकतापनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. आधिदैविक ताप. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला आध्यात्मिक । त्या उपरी आधिभौ- तिक । आतां बोलिजेल आधिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥ श्लोक ॥ शुभा- शुभैः कर्मभिस्तैर्देहांते यमयातना । स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं विद्ध्याधि- दैविकम् ॥ १ ॥ टी० ॥ शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना । स्वर्ग नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २ ॥ नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें । केलीं परी तीं दुःखदायकें । यमयातना भोगविती ॥ ३ ॥ अंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें । नाना सामर्थ्यांचेनि बळें । अकृत्यें करिती ॥ ४ ॥ नीति सांडोनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां । यमयातना भोगितां । जीव जाय ॥ ५ ॥ ⁵डोळे झांकूनि स्वार्थबुद्धी । नाना अभिलाष कुबुद्धी । ⁶वृत्तिभूमीसि साधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६ ॥ मातले- पणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात । ⁷अप्रमाणं क्रियां करित । म्हणोनियां यमयातना ॥ ७ ॥ मर्यादा सांडोनियां चालती । ग्राम दंडी ग्रामाधिपती । देश दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८ ॥ देशाधिपतीसि दंडी १. कंगालपणा. २. हलक्या प्रतीचें अन्न. ३. अडचणीची. ४. घाबरतो. ५ दुर्वर्तन. ६. वतन. ७. अशारू, गैर.