दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 124, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४ था. ] वंदनभक्ति. ८९ पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१ ॥ मनें भगवंतासि पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें । मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२ ॥ जें जें आपणासि पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे । येणें प्रकारें कीजे मानसपूजा ॥ ३३ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके अर्चनभक्तिनिरुपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. वंदनभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागें झालें निरूपण । पांचवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । सहावी भक्ती ॥ १ ॥ सहावी भक्ती ते वंदन । करावें देवासि नमन । संत साधु आणि सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २ ॥ सूर्यास करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार । सद्गुरूस करावे नम- स्कार । साष्टांग भावें ॥ ३ ॥ साष्टांग नमस्कारासि अधिकारू । नाना प्र- तिमा देव गुरू । अन्यत्र नमनाचा विचारू । अधिकारें करावा ॥ ४ ॥ छप्पन्न कोटी वसुमती-। मध्यें विष्णुमूर्ती असती । तयांस नमस्कार प्रीतीं । साष्टांग घालावे ॥ ५ ॥ पशुपती श्रीपती आणि गर्मेस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती । तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमें विशेष ॥ ६ ॥ श्लोक ॥ शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा । एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥ १ ॥ भक्त ज्ञानी आणि वीतरागी । महानुभाव तापसी योगी । सत्पात्र देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७ ॥ वेदशास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणि विद्वज्जन । याज्ञिक वैदिक पवित्र जन । नमस्कारीत जावे ॥ ८ ॥ जेथें दिसती विशेष गुण । तेंचि सद्गुरूचें अधि- ष्ठान । या कारणें तयासिनमन । अत्यादरें करावें ॥ ९ ॥ गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अनंत मूर्ती । नाना देव सांगूं किती । पृथगाँ- कारें ॥ १० ॥ सर्व देवांसि नमस्करिलें । तें एका भगवंतासि पावलें । यदर्थी वचन बोलिलें । आहे तें ऐका ॥ ११ ॥ श्लोक ॥ आकाशात्पतितं १. पृथ्वी. २. शंकर. ३. विष्णु. ४. सूर्य. ५. आसक्ति नाहीं असे. ६. देवी. ७. निरनिराळ्या रूपानें.