दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 188, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंळाया कारण । केलेंच करावें निरूपण । तेथील जे कां निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७ ॥ अजन्मा तो सांग कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न । येथें कैसें निरूपण । बोलिलें आहे ॥ ४८ ॥ जाणोनि शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्युत्तर । तेंचि आतां अतितत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९॥ ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंचि जाण । तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोहि आतां सांगतों ॥ ५० ॥ स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार । तेथें तुवां सारासार । विचार केला ॥ ५१ ॥ रिघोनि सद्गुरूंसि श- रण । काढून शुद्ध निरूपण । याची करिसी ऊनखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२॥ याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव । निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३ ॥ ज्ञानगोष्टीचा गलबला । सरोन अर्थ प्रगटला । याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४ ॥ तुज वाटे हे जागृती । मज झाली अनुभवप्राप्ती । या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥ अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला । हााहि स्वप्नींचा चेइला । नाहींस बापा ॥ ५६ ॥ जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी । जागेपणें स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७ ॥ स्वप्नीं वाटे जागेपण । तैसी अनुभवाची खूण । आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप ॥ ५८ ॥ जागृति या पलीकडे । तें सांगणें केवीं घडे । जेथें धारणाचि मोडे । विवेकाची ॥ ५९ ॥ म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये असें जाण । निःशब्दांची ऐसी खूण । ओळखावी ॥ ६० ॥ ऐसें आहे समाधान । बोल- तांच न ये जाण । इतुकेन बाणली खूण । निःशब्दाची ॥ ६१ ॥ इति श्रीदा- सबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके अनिर्वाच्यनिरूपणं नाम दशमः समासः ॥१० ॥ १. अनुभव. २. जागृत झाला. ३. स्वप्नात जसें जागृत आहोंसें वाटतें, त्याप्रमाणें तुला अनुभव आला असें वाटतें; पण खऱ्या जागृताला, मी स्वप्नांत नाहीं, जागा आहे, असें स्मरण असण्याचें कारण नाहीं, त्याप्रमाणें खऱ्या अनुभ- वाचे वेळीं 'अनुभव आला' हें स्फुरण राहाणें शक्य नाहीं. ४. स्थिति. ५. जेथें शब्दांचें कार्य नाहीं अशा ब्रह्माची.