भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 190, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 190

७ वा.] मंगलाचरण. १५५ तुटे भेदाची कडसणी । देहेंविण लोटांगणी । तया प्रभूसी ॥ १८ ॥ साधु- संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन । आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९ ॥ संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन । माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २० ॥ ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्र- काश लोपला । अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१ ॥ नाहीं सत्वांचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे जेणें । सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२ ॥ देहबुद्धि अहंकार । निजले घोरती घोर । दुःखें आक्रंदती थोर । विषयसुखाकारणें ॥ २३ ॥ निजले असतां मेले । पुनः उपजतांच निजले । ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ २४ ॥ निर्दसुरेपणींचि सैरा- वैरा । बहुतों केल्या येरझारा । नेणोनियां परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥२५॥ तया कष्टाचें निरसन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान । म्हणोनि हें निरूपण । अध्यात्मग्रंथीं ॥ २६ ॥ सकळ विद्येमध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार । दशमाध्यायीं शार्ङ्गधर । भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७ ॥ श्लोक ॥ अध्यात्म- विद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ या कारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्म- विद्येचा परमार्थ । पावावया तोचि समर्थ । जो सर्वांगें श्रोता ॥ २८ ॥ ज- याचें चंचल हृदय । तेणें ग्रंथ सोडूंचि नये । सोडितां अलभ्य होय । अर्थ येथींचा ॥ २९ ॥ जयास जोडला परमार्थ । तेणें पाहावा हा ग्रंथ । अर्थ शोधितां परमार्थ-। निश्चय बाणे ॥ ३० ॥ जयास नाहीं परमार्थ । तयास न कळे येथींचा अर्थ । नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधास न कळे ॥ ३१ ॥ एक म्हणती मराठें काय । हें तों भल्यानें ऐकों नये । तीं मूर्खें नेणती सोय । अर्थान्वयाची ॥ ३२ ॥ लोहाची मांदूस केली । नाना रत्‍नें सांठविलीं । ती अभाग्योन त्यागिली । लोखंड म्हणोनी ॥ ३३ ॥ तैसी भाषा प्राकृत । अर्थ- वाद आणि सिद्धांत । नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४ ॥ आह्नांच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण । द्रव्य घ्यावें सांठवण । पा- होंचि नये ॥ ३५ ॥ परिस देखिला अंगणीं । मार्गी सांपडला चिंतामणी । अव्हावेळ महागुणी । कूपामध्यें ॥ ३६ ॥ तैसें प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि


१. दोरी. २. शीण पावतात. ३. सात्विक वृत्तिरूपी. ४. झोंपेतच. ५. ठेवण्याचा लाभ. ६. पेटी. ७. आपोआप. ८. दक्षिणवर्ती वेल.