दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 192, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७ वा. ] ब्रह्मनिरूपण. १५७ माया सर्व विकार । माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५ ॥ माया दृश्य दृष्टीस दिसे । माया भास मनास भासे । माया क्षणभंगुर नासे । वि- वेकें पाहतां ॥ ५६ ॥ माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप । मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७ ॥ माया बहुरूप बहु- रंग । माया ईश्वराचा संग । माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८ ॥ माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना । माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९ ॥ ऐसी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६० ॥ पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१ ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. ब्रह्मनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निर्विकार । ब्रह्मास नाहीं पारावार । बोलती साधु ॥ १ ॥ ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं एक । ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं १ ॥२॥ ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत २ । ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३ ॥ ब्रह्म दृश्यावेगळें । ब्रह्म शून्यत्वा निराळें । ब्रह्म इंद्रियांच्या मेळें । चोजवेना ३ ॥ ४ ॥ ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खास असेना । ब्रह्म गुरूविण येईना । अनुभवासी ॥ ५ ॥ ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्माऐसें नाहीं सार । ब्रह्म सूक्ष्म अगोचर ४ । ब्रह्मादिकांसी ॥ ६ ॥ ब्रह्म शब्दें ऐसें तैसें । बोलिजे त्या- हूनि आनारिसें ५ । परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७ ॥ ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत । ब्रह्मास हे दृष्टांत । देतां न शोभती ॥८॥ ब्रह्मासारिखें दुसरें । पाहतां काय आहे खरें । ब्रह्मीं दृष्टांतउत्तरें ६ । कदा न साहे ॥९॥ जेथें वाचा निवर्तेती ७ । मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती । ऐसी बोलिली श्रुती । सिद्धांतवचनीं ॥ १० ॥ कल्पनारूप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं । म्हणोनि हें वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११ ॥ आतां मनासि १. चळत नाहीं असें. २. असणारें. ३. जाणवेना. ४. अदृश्य. ५. निराळें. ६. दृष्टांतांनीं युक्त भाषणें. ७. परत वळते.