दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 195, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६० श्रीदासबोध. [ दशक र्ची ॥ ५१ ॥ ऐसीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत । त्याचा क- रावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥ तो विश्रांतीचा विश्राम । आदि- पुरुष आत्माराम । तें एकचि परब्रम्ह । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥ तेंचि कळा- याकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चय बाणे ॥ ५४ ॥ खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्मों शा- स्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमद- शके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. चतुर्दश ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान । जेणें होय समाधान । साधकांचें ॥ १ ॥ रत्नें साधायाकारणें । मृत्तिका लागे एकवटणें । चौदा ब्रम्हांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २ ॥ पदार्थाविण संकेत । द्वैतावगळा दृष्टांत । पूर्वपक्षांविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३ ॥ आधीं मिथ्या उभारावें । मग तें वोळखोन सांडावें । पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४ ॥ म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सि- द्धांत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५ ॥ पहिलें तें शब्द- ब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरें ब्रह्म । तिसरें खंब्रह्म² । बोलिली श्रुती ॥ ६ ॥ चौथें जाण सर्व³ ब्रह्म । पांचवें चैतन्य⁴ ब्रह्म । साहावें सत्ता⁵ ब्रह्म । साक्षि ब्रह्म सातवें ॥ ७ ॥ आठवें सगुण ब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म । दाहावें वाच्य⁶ ब्रह्म । जाणावें पै ॥ ८ ॥ अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें । तदा- कार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्यं⁷ ॥ ९ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रम्हें । यांचीं निरूपिलीं नामें । आतां स्वरूपाचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १० ॥ अनुभवांविण भ्रम । या नांव शब्दब्रम्ह । आतां ओमित्येकाक्षरें ब्रम्ह । तें एकाक्षर ॥ ११॥ खं शब्दे आकाशब्रम्ह । महदाकाश व्यापक ब्रम्ह । आतां बोलिजेल सूक्ष्मब्रम्ह । सर्व ब्रम्ह ॥ १२ ॥ पंचभूतांचें कोडें । जें जें तत्व दृष्टीस पडे । तें तें ब्रम्ह- चि रोकडें । बोलिजत आहे ॥ १३ ॥ या नांव सर्व ब्रम्ह । श्रुतिआश्रयाचें १. ॐ असें एक अक्षर. २. आकाशरूप. ३. सर्व दृश्य हेंच ब्रह्म. ४. ज्ञानरूप. ५. अस्तित्वमात्र. ६. वाणीरूप. ७. शब्दानें सांगण्यास अशक्य.