दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 202, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७ वा.] बद्धमुक्त. १६७ कैसें राहे साचापुढें । जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९ ॥ तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे । मग हें तुटे आपसें । द्वैतानु- संधान ॥ ३० ॥ कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आंतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१ ॥ शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे सबळें । हेंचि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२ ॥ शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण । स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३ ॥ सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन । अद्वैत निश्चयाचें ज्ञान । तेंचि शुद्ध कल्पना ॥ ३४ ॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अ- शुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५ ॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वै- ताचा निश्चितार्थ । आणि सबळ ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६ ॥ अद्वैत क- ल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे । द्वैतासरसी निरसे । सबळ कल्पना ॥ ३७ ॥ कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें । सबळ गेलियानंतरें । शुद्ध उरली ॥ ३८ ॥ शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप । कल्पितां तद्रूप । होय आपण ॥ ३९ ॥ कल्पनेस मिथ्यात्व आलें । सहजचि तद्रूप झालें । आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४० ॥ जेचि क्षणीं निश्चय चले । तेचि क्षणीं द्वैत उँफाळे । जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१ ॥ तैसें ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण । याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२ ॥ आतां असो हें बोलणें झालें । आशंका फेहूँ एका बोलें । जयास अद्वैत भासलें । तें तूं नव्हेंसी सर्वथॉ ॥ ४३ ॥ मार्गील आशंका फिटली । इतुकेन हे कथा संपली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. बद्धमुक्त. श्रीगणेशाय नमः ॥ अद्वैत ब्रह्म निरूपिलें । जें कल्पनारहित संचलें । क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १ ॥ परी म्यां तदाकार व्हावें । १. जगताचा भास. २. तुटून पडता. ३. शबल, औपाधिक. ४. उसळतें. ५. कल्पनेला अद्वैत भासतें, ती कल्पना कांहीं स्वरूप नव्हें.