भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 206, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 206

७ वा. ] साधनप्रतिष्ठा. १७१ ॥ ५७ ॥ बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न । बाधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८ ॥ एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम । मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९ ॥ असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां । ते कल्पना तरी तत्वतां । साच १ आहे ॥ ६० ॥ म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ । स्वप्न मिथ्या तात्काळ । जागृतीस होय ॥ ६१ ॥ स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं आला । कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२ ॥ म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान । शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३ ॥ बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह । साधु सदा निःसंदेह । देहा- तीत वस्तु ॥ ६४ ॥ आतां असो हें पुढती । पुढें कळावें कोणे रीतीं । तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. साधनप्रतिष्ठा. श्रीगणेशाय नमः ॥ वस्तूसि जरी कल्पावें । तरी तें निर्विकल्प स्वभा- वें । तेथें कल्पनेच्या नांवें । शून्याकार ॥ १ ॥ तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हातां । वोळखी ठावीं २ नै पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २ ॥ कांहीं दृष्टिस न दिसे । मनास तेंहि न भासे । न भासे न दिसे कैसें । वोळखावें ॥ ३ ॥ पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार । कल्पूं जातां अं- धकार । भरला वाटे ॥ ४ ॥ कल्पूं जातां वाटे काळें । परी तें काळें ना पिवळें । आरक्त निळें ना ढवळें ३ । वर्णरहित ॥ ५ ॥ जयास वर्ण व्यक्ती ४ नसे । आसाहूनि अनारीसें । रूपचि नाहीं कैसें । वोळखावें ॥ ६ ॥ न दि- सतां वोळखण । किती धरावी आपण । हें तों श्रमासीच कारण । होत असे ॥ ७ ॥ जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त ५ । जो अचिंत्य चिं- तनातीत । परमपुरुष ॥ ८ ॥ श्लोक ॥ अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गु- णात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १ ॥ अचिंत्य तें चिंतावें । अव्यक्तास आठवावें । निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९ ॥ जें दृष्टिसचि १. खरी आहे? नाहीं. २. सांपडत नाहीं. ३. पांढरें. ४. आकार. ५. गुप्त.