दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 213, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंस्व त्यागावें । जें मायिक स्वभावें । जेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३ ॥ एक्या ग्रंथें निश्चय केला । तो दुजयानें उडविला । तेणें संशयाचि वाढला । जन्मवरी ॥ ४ ॥ जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती । अद्वैतग्रंथ प- रमार्थीं । श्रवण करावे ॥ ५ ॥ जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी । प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६ ॥ जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक । तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७ ॥ जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत । तेणें क्षोभलें उठे चित्त । श्रोत्यांचें ॥ ८ ॥ आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे । नाहीं तरी कंटाळे । मानस ऐकतां ॥ ९ ॥ ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी । तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १० ॥ प्रीतींचें लक्षण ऐसें । अंतरीं उठे अनायासें । पाणी पाणवाटे जैसें । आपणचि धांवे ॥ ११ ॥ तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर । तेथें पाहिजे सारासार । विचा- रणा ते ॥ १२ ॥ जेथें कुलदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती । इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३ ॥ घेतां अनंताच्या व्रता । तेथें नलगे भगवद्गीता । साधुजनांसि वार्त्ता । फळाशेची नाहीं ॥ १४ ॥ वीर- कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५ ॥ नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य झालीं । विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६ ॥ मल्हारि- माहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी । काशीमाहात्म्य व्यंक- टेशीं । शोभा न पावे ॥ १७ ॥ ऐसें सांगतां असे वाढ । परी जेथील तेथेंच गोड । तैशी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८ ॥ योगियापुढें राहाणे । परीक्षावंतापुढें पाषाण । पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९ ॥ वेदज्ञापुढें जंती । निस्पृहापुढें फलश्रुती । ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राची ॥ २० ॥ ब्रह्मचाऱ्यापुढें नाचैंणी । रासक्रीडा निरूपणीं । राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१ ॥ तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारिक टिपडें । तेणें त्याचें कैसें घडे । समाधान ॥ २२ ॥ रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा । १. जादूटोणा. २. जैनांचा स्वामी. ३. कामशास्त्राची. ४. नायकीण. ५. ब्रह्म- निष्ठापुढें. ६. अमृताला.