दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 247, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२१२ श्रीदासबोध. [ दशक आरंभ । जाहलाचि नाहीं ॥ ३१ ॥ जेणें दृश्य केलें विसंचें । तयास कैंचा होय प्रपंच । या कारणें निष्प्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥ अवघें ब्रह्मांड त्याचें घर । पांचभौतिक हा जोजार । मिथ्या जाणोनि सत्वर । त्याग केला ॥ ३३ ॥ या कारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे । जयाची वासना समरसे । शुद्ध स्वरूपीं ॥ ३४ ॥ आपला आपण आघवा । शोक कोणाचा करावा । म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥ दृश्य सांडूनि नाशवंत । स्वरूप सेविलें शाश्वत । या कारणें शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६ ॥ शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते झाली निवृत्ती । म्हणोनि साधु आदिअंतीं । शोकरहित ॥ ३७ ॥ मोहें झळंबावें मन । तरी तें मनचि झालें उन्मन । या कारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ साधु वस्तु अद्वय । तेथें कैंचें वाटेल भय । परब्रह्म तें निर्भय । तोचि साधु ॥ ३९ ॥ या कारणें भयातीत । साधु निर्भय निवांत । सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥ सत्यस्वरूपीं अमर झाला । भय कैंचें वाटेल त्याला । या कारणें साधुजनाला । भयचि नाहीं ॥ ४१ ॥ जेथें नाहीं द्वैतभेद । आपला आपण अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ बुद्धीनें निर्मिलें नि- र्गुणा । त्यास कोणीच नेईना । या कारणें साधूजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥ साधु आपण एक । तेथें कैंचा दुःख शोक । दुजेंविण अविवेक । येणार नाहीं ४४ ॥ आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची । म्ह- णोनि नैराश्यता साधूची । ओळखावी ॥ ४५ ॥ मृदुपणें जैसें गगन । तैसें साधूचें लक्षण । या कारणें साधुवचन । कठिण नाहीं ॥ ४६ ॥ स्वरूपाच्या संयोगीं । स्वरूपचि झाला योगी । या कारणें वीतरागी । निरंतर ॥ ४७ ॥ स्थिति बाणतां स्वरूपाची । चिंता सोडिली देहाची । या कारणें होणाराची । चिंता नाहीं ॥ ४८ ॥ स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी । या का- रणें निरुपाधी । साधुजन ॥ ४९ ॥ साधु स्वरूपींच राहे । तेथें संगाचि न साहे । म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५० ॥ अलक्षास लावि- ती लक्ष । म्हणोन साधु परम दक्ष । वोहूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५१ ॥ स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ । साधु स्वरूप- १. अदृश्य. २. एकरस होतें. ३. कल्पनारहित. ४. आसक्तिशून्य. ५. कैवार.