दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 257, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२२२ श्रीदासबोध. [ दशक ऐसें श्रोत्यांचें अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान । आतां याचें समाधान । केलें पाहिजे ॥ ७ ॥ वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें । परी हें तुमच्या अनुभवें । तुम्हांस घडे ॥ ८ ॥ ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा । संपदेविण जो धिंवैसा । तो निरर्थक ॥ ९ ॥ नाहीं ज्ञानाची संपदा । अज्ञानदरिद्रें आपदा । भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें ॥ १० ॥ ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरें । योगी ओळखावा योगीश्वरें । महा चतुर तो चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥ अनुभवी अनुभवियासि कळे । अलिप्त अलिप्त- पणें निवळे । विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥ बद्धा- सारिखा सिद्ध । आणि सिद्धासारिखा बद्ध । एक भावील तो अबद्ध । म्ह- णावा नलगे ॥ १३ ॥ झडपला तो देहधारी । आणि देहधारक पंचाक्षरी । परंतु दोघां एक सैरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥ तैसा अज्ञान पतित । आणि ज्ञानी जीवन्मुक्त । दोघां समान मानी तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥ आतां असो हे दृष्टांत । प्रचीत बोलों कांहीं हेत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षणएक व्हावें ॥ १६ ॥ जो ज्ञानें मुक्त झाला । जो विवेकें विराला । जो अनन्यपणें उर- ला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥ तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि व्हावें । तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥ देहीं पाहतां दिसेना । तत्त्वें शोधितां भासेना । ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्या ॥ १९ ॥ दि- सतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं । तयास पाहतां वरीवरी । कळेल कैसा ॥ २० ॥ कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर । ज- यास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥ तो परमात्मा केवळ । तयास नाहीं मायाजाळ । अखंड हेतूचा विटाळ । झालाच नाहीं ॥ २२ ॥ ऐसा जो कां योगिराज । तो आत्मा सहजीं सहज । पूर्णब्रह्म वेदबीज । दे- हाकारें कळेना ॥ २३ ॥ देहें भावितां देहचि दिसे । अंतर अनारिसें असे । तयास शोधितां नसे । जन्ममरण ॥ २४ ॥ जयास जन्ममरण व्हावें । तें तो नव्हेचि स्वभावें । नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥ निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला । तरी उडाला आणि जन्मला । आपला आपण ॥ २६ ॥ माध्यान्हीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडे आप- १. सामर्थ्यावांचून. २. धैर्य. ३. योग्यता. ४. कल्पना केली असतां. ५. वेगळें.