दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 259, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२२४ श्रीदासबोध. [ दशक ४. जाणपण. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें लोक सकळ । एक संपन्न एक दुर्बळ । एक निर्मळ एक वोंगळ । काय निमित्तें ॥ १ ॥ कित्येक राजे नांदती । कि- त्येक दरिद्र भोगिती । कित्येकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमाधम ॥ २ ॥ ऐसें काय निमित्त झालें । हें मज पाहिजे निरूपिलें । याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥ हे सकळ गुणापासी गती । १सगुण भाग्य- श्रो भोगिती । अवगुणास दरिद्रप्राप्ती । यदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥ जो जेथें उपजला । तो तेथें व्यवसायीं उमजला । तयास लोक म्हणती भला । कार्यकर्ता ॥ ५ ॥ जाणता तो कार्य करी । नेणता कांहींच न करी । जाण- ता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥ हें तों प्रगटचि असे । जनीं पाहतां प्रत्यक्ष दिसे । विद्येविण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥ आपुली विद्या न शिकसी । तरी काय भीक मागसी । जेथें जेथें बुद्धि ऐसी । वडील सांगती ॥ ८ ॥ वडील आहे करंटा । आणि समर्थ होय धाकुटा । कां जो विद्येनें मोठा । म्हणोनियां ॥ ९ ॥ विद्या नाहीं बुद्धि नाहीं । वि- वेक नाहीं साक्षेप नाहीं । कुशलता नाहीं व्याप नाहीं । म्हणोन प्राणी करंटा ॥ १० ॥ इतुकेंहि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे । वैभव सोडि- तां आपैसें । पाठी लागे ॥ ११ ॥ वडील समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी । वडिलांऐसा व्याप न करी । म्हणोनियां ॥ १२ ॥ जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव । तोलसारिखा हावभाव । लोक करिती ॥ १३ ॥ विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे । करंटपणें चोखटा दिसे । वोंगळ आणि विकारी ॥ १४ ॥ पशु पक्षी गुणवंत । त्यांस ग्रहण करिती समर्थ । गुण नसतां जिणें व्यर्थ । प्राणिमात्रांचें ॥ १५ ॥ गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं । कुशलता नाहीं तर्क नाहीं । प्राणिमात्रांसी ॥ १६ ॥ या कारणें उत्तम गुण । तेंचि भाग्याचें लक्षण । लक्षणेंविण अवलक्षण । सहजचि झालें ॥ १७ ॥ जना- मध्यें जो जाणता । त्यास आहे मान्यता । कोणी एक विद्या असतां । महत्व पावे ॥ १८ ॥ प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि १. गुणी पुरुष. २. उद्योग. ३. प्रतिष्ठा.