दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 261, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२२६ श्रीदासबोध. [ दशक कळे ॥ ३९ ॥ जाणणें म्हणिजे स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण । दोहीं- मध्यें कोण प्रमाण । शाहणे जाणती ॥ ४० ॥ जाणते लोक शाहाणे । नेणते वेडे दैन्यवाणे । विज्ञान तेंहि जाणतपणें । कळों आलें ॥ ४१ ॥ जेथें जाणतेपण खुंटलें । तेथें बोलणेंहि तुटलें । हेतुरहित जाहलें । समाधान ॥ ४२ ॥ श्रोते म्हणती हें प्रमाण । झालें परम समाधान । परी पिंडब्रह्मांड- ऐक्यलक्षण । आम्हां निरूपावें ॥ ४३ ॥ ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे । बहुत बोलती ऐसें । परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके जाणपणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. अनुमाननिरसन. श्रीगणेशाय नमः ॥ पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । न ये आमुच्या अनु- माना । प्रचीत पाहतां नाना । मतें भांबावती ॥ १ ॥ जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । ऐसी बोलावयाची प्रौढी । हें वचन घडीनें घडी । तत्त्वज्ञ बोलती ॥ २ ॥ पिंडब्रह्मांड एक राहाटी । ऐसी लोकांची धाटी । परी प्रत्ययाचे परिपाठीं । तगों न शके ॥ ३ ॥ स्थूल सूक्ष्म कारण महाकारण । हे पिंडींचे चार देह जाण । विराट हिरण्यगर्भ अव्याकृत मूळप्रकृति हे खूणें । ब्रम्हां- डाची ॥ ४ ॥ हे शास्त्रधाटी जाणावी । परी प्रचीती कैसी आणावी । प्रचीत पाहतां गाथागोवी । होत आहे ॥ ५ ॥ पिंडीं आहे अंतःकरण । तरी ब्रह्मांडीं विष्णु जाण । पिंडीं बोलिजे तें मन । ब्रह्मांडीं चंद्रमा ॥ ६ ॥ पिंडीं बुद्धि ऐसें बोलिजे । तरी ब्रह्मांडीं ब्रम्हा ऐसें जाणिजे । पिंडीं चित्त ब्रह्मांडीं वोळखिजे । नारायण ॥ ७ ॥ पिंडीं बोलिजे अहंकार । ब्रह्मांडीं रुद्र हा निर्धार । ऐसा बोलिला विचार । शास्त्रांतरीं ॥ ८ ॥ तरी कोण विष्णूचें अंतःकरण । चंद्राचें कैसें मन । ब्रम्हाचें बुद्धिलक्षण । मज निरू- पावें ॥ ९ ॥ नारायणाचें कैसें चित्त । रुद्र अहंकाराचा हेत । हा विचार पाहोन नेमस्त । मज निरूपावें ॥ १० ॥ प्रचीत निश्चयापुढें अनुमान । जैसें सिंहापुढें आलें श्वान । खऱ्यापुढें खोटें प्रमाण । होईल कैसें ॥ ११ ॥ परी यासि पारखी पाहिजे । पारखीनें निश्चय लाहिजे । परीक्षा नसतां १. साक्षात्कार. २. मार्गामध्यें. ३. नांवें; चार देहांचीं चार.