दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 279, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२४४ श्रीदासबोध. [ दशक प्रत्यय आणिला । पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला । शहाणा मूर्ख समजा- विला । एका वचनें ॥ २३ ॥ शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें लटक्याला । विचार पाहतां आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥ तथापि बोलों कांहीं एक । शास्त्र रक्षून कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पा- हिजे ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके देहाशंका- निरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. देहाशंका. श्रीगणेशाय नमः ॥ उपाधीविणें जें कां आकाश । तेंचि ब्रह्म निराभास । ते निराभासीं मूळमायेस । जन्म जाहलें ॥ १ ॥ ते मूळमायेचें लक्षण । वायुस्वरूपचि जाण । पंचभूतें आणि त्रिगुण । वायुअंगीं ॥ २ ॥ आका- शापासून वायु झाला । तो वायुदेव बोलिला । वायूपासून अग्नि झाला । तो अग्निदेव ॥३॥ अग्नीपासून झालें आप । तें नारायणाचें स्वरूप । आपा- पासून पृथ्वीचें रूप । तें बीजाकारें ॥ ४ ॥ ते पृथ्वीचे पोटीं पाषाण । बहु- दैवांचें लक्षण । नाना प्रचीत प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५ ॥ नाना काष्ठ वृक्ष मृत्तिका । प्रचीत रोकडी विश्वलोकां । समस्त देवांचा थारा एका । वायूम- ध्यें ॥ ६ ॥ देव यक्षिणी कात्यायनी । चामुंडा जखिणी मानविणी । नाना शक्ति नाना स्थानीं । देहपरत्वें ॥ ७ ॥ पुरुषनामें कितीएक । देव असती अनेक । भूतें दैवतें नपुंसक । नामें बोलिजेती ॥८॥ देव देवता देवतें भुतें । पृथ्वीमध्यें असंख्यातें । परंतु या समस्तांतें । वायुस्वरूप बोलिलें ॥ ९ ॥ वायुस्वरूप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें । गुप्त प्रगट होणें जाणें । समस्तांसी ॥ १० ॥ वायुस्वरूपें विचरती । वायूमध्ये जगज्योती । जाणती कळा वासना वृत्ती । नाना भेदें ॥ ११ ॥ आकाशापासून वायु झाला । तो दों प्रकारें विभागला । सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं ॥ १२ ॥ एक वारा सकळ जाणती । एक वायूमधील जगज्ज्योती । जग- ज्योतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥ वायु बहुत विकारला । परंतु दों प्रकारें विभागला । आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥१४॥ वायूपासून तेज झालें । उष्ण शीतळ प्रकाशलें । द्विधारूप ऐकिलें । पाहिजे