दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 367, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंगिती । एक तस्कर पलोन जाती । एकाची प्रगट महंती । एकाची कान- कोंडी ॥ २३ ॥ आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो शीण । धूर्त आणि विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि आकाळिले । धूर्तापासीं कांहीं न चले । बाजार्याचें ॥ २५॥ या कारणें मुख्य मुख्य । तयांसी करावें सख्य । येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥ धूर्तांसि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तांच पवाडे । उगोचि हिंडती वेडे । कार्ये- विण ॥ २७ ॥ धूर्तांसि धूर्तपण कळलें । तेणें मनासी मन मिळालें । परी हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥ २८ ॥ समर्थांचे राखितां मन । तेथें येती उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥ वोळखीनें वो- ळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी । नीतिन्यायें वाट रोधावी । पाखं- डाची ॥ ३० ॥ वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥ निस्पृह आणि नित्य नूतन । प्र- त्ययाचें ब्रह्मज्ञान । प्रकट जाणता सज्जन । दुर्लभ जगीं ॥ ३२ ॥ नान जिन्नस पाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें । चंचळपणें तदनंतरें । सकळा ठायीं ॥ ३३ ॥ एकेठायीं बैसोनि राहिला । तरी मग व्यापचि बुडाला । सावध- पणें ज्याला त्याला । भेटी द्यावी ॥ ३४ ॥ भेटभेटों उरी राखणें । हीं चातु- र्याचीं लक्षणें । मनुष्यमात्र उत्तमगुणें । सावधान पावें ॥ ३५ ॥ इति श्रीदास- बोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चातुर्यनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. निस्पृहलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ पृथवीमध्यें नानाशरीरें । उदंड दाटलीं लहान- थोरें । पालटती मनोविकारें । क्षणक्षणां ॥ १ ॥ जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती । सारिख्याच नसती आदिअंतीं । नेमाचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनी ॥ २ ॥ कितेक म्लेंच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांतें आटले । देशभाषेनें रोधिले । कितीएक ॥ ३ ॥ महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला । अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कार्मे ॥ ४ ॥ कित्येक युद्धप्रसंगीं गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले । रात्रंदिवस करूं लागले १. चोर. २. मिसळतो. ३. स्वभाव. ४. ख्रिस्ती जातींत. ५. मराठ्यांचा.