दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 374, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१५ वा. ] चातुर्यलक्षण. ३३९ समाधान होतें ॥ २१ ॥ मनास मिळतां मन । पाहून येती निरंजन । चं- चळचक्रें² उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥ एकदां जाऊन पाहून आले । मग तें सन्निध देखिलें । चर्मचक्षू लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥ नाना श- रीरीं चंचळ । अखंड करी चळवळ । परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठायीं ॥ २४।¹ चंचळ धांवे एकीकडे । वोस पडे दुसरीकडे । चंचळ पुरे सर्वांकडे । हैं तों घ- डेना ॥ २५ ॥ चंचळ चंचळास पुरेना । अवघें चंचळ विवरेना । निश्चळ अ- पार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥ गगनीं चालिली हवावी³ । कैसी पावेल पार पदवी । जातां मध्येंच विझावी । हा स्वभाव तिचा ॥ २७ ॥ मनो- धर्म एकदेशी । कैंची आकळील वस्तूसी । निगुर्ण सांडून अपैसीं⁴ । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥ नाहीं सारासार विचार । तेथें अवघा एककार । खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥ ब्रह्मांडाचें महाकारण । तेथूनि हें पंचीकरण । महावाक्याचें विवरण । वेगळेंच असे ॥ ३० ॥ महत्तत्व मह- द्भूत । तोचि जाणावा भगवंत । उपासना हे समाप्त । येथून झाली ॥ ३१ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड⁵ वेद हे प्रमाण । ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चंचल- लक्षणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. चातुर्यलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ पिल्यापासून⁶ कृष्णें⁷ झालें । भूमंडळीं विस्तारिलें । तेणेंविण उमजलें । हें तों घटेना ॥ १ ॥ आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण । अधम आणि उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥ महीसुत⁸ सर- साविला । सरसाऊन द्विधा केला । उभयतां मिळोन चालला । कार्यभाग ॥ ३ ॥ श्वेताश्वेतास⁹ गांठी पडतां । मध्यें कृष्णें¹⁰ मिश्रित होतां । इहलोक- सार्थकतैं¹¹ । होत आहे ॥ ४ ॥ विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होय चतुर । सद्यःप्रचीत साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥ सकळांस जें मान्य ।
१. शुद्ध ब्रह्म. २. मायेचें चक्र. ३. बाण. ४. आपल्याशींच. ५. तीन भागांचा. ६. सर्वांचें मूळ ब्रह्म त्यापासून. ७. माया. ८. अहंकार. ९. सत्त्वगुणाची व रजो- गुणाची. १०. तमोगुण. ११. जगाची राइटी.