दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 384, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६ वा. ] वाल्मीकिस्तवन. ३४९ चंचल । भूतांस ध्यातां केवळ । भूत होय ॥ ३० ॥ जो पावला शेवटवरी । तयास हें कांहींच न करी । अंतर्निष्ठा बाजिगिरी । तैसी माया ॥ ३१ ॥ मिथ्या ऐसें कळों आलें । विचारोन सदृढ झालें । अवघें भयचि उडालें । अकस्मात ॥३२॥ उपासनेचें उत्तीर्ण¹ व्हावें । भक्तें भजन वाढवावें । अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके सिद्धांतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३३७. दशक सोळावा. १. वाल्मीकिस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक । जयाचेनि हा त्रिलोक । पावन जाहला ॥ १ ॥ भविष्य आणि शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टी । धांडोळितां सकळ सृष्टी । श्रुत नव्हे ॥२॥ भवि- ष्याचें एक वचन । कदाचित झालें प्रमाण । तरी आश्चर्य मानिती जन । भूमंडळींचे ॥ ३ ॥ नसतां रघुनाथ अवतार । नाहीं पाहिला शास्त्राधार । रामकथेचा विस्तार । विस्तारला जेणें ॥ ४ ॥ ऐसा जयाचा वाग्विलास² । ऐकोनि संतोषला महेश । मग विभागिलें त्रैलोक्यास । शतकोटि रामायण ॥ ५ ॥ जयाचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें । राम- उपासकांस झालें । परम समाधान ॥ ६ ॥ ऋषि होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार । परी वाल्मीकासारिखा कवीश्वर । नै भूतो न भवि- ष्यति³ ॥ ७ ॥ पूर्वी केलीं दुष्ट कर्में । परी पावन झाला रामनामें । नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥ उफराटें नाम म्हणतां वाचे । पर्वत फुटले पापाचे । ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥९॥ वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन झालें । शुष्ककाष्ठीं अंकुर फुटले । तपो- बळें जयाच्या ॥ १० ॥ पूर्वी होता वाल्हा कोळी । जीवघातुक भूमंडळीं । तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषीश्वरीं ॥ ११ ॥ उपरति⁴ आणि १. उतराई. २. भाषाप्रावीण्य. ३. झालों नाहीं व होणारही नाहीं. ४. वैराग्य.