दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 388, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंभेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद । नाना विभूती छंदभेद । नाना खाणी ॥ १९ ॥ बहुरत्ना वसुंधरा । ऐसा पदार्थ कैंचा दुसरा । अफाट पडली सैरा- वैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥ अवघी पृथ्वि फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । दुजी तुळणा न साहे । धरणीविषयीं ॥ २१ ॥ नाना वल्ली नाना पिकें । देशोदेशीं अनेकें । पाहों जातां सारिख्यास सारिखें । एकहि नाहीं ॥ २२ ॥ स्वर्ग मृत्यु पाताळें । अपूर्व रचिलीं तिन्ही तोळें । पाताळ- लोकीं महान्योळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥ नाना वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाल धरणी । अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥ गड कोट नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें । सकळां ठायीं जगदीश्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥ महा बळी होऊन गेले । पृथ्विवरी चौताळले । सामर्थ्यं राहिले । हें तो घडेना ॥ २६ ॥ असंभाव्य हे जगती । जीव किती येती जाती । नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥ सध्या रोकडें प्र- माण । कांहीं करावें नलगे अनुमान । नानाप्रकारें जीवन । पृथ्विचेनि आ- धारें ॥ २८ ॥ कित्येक भूमि माझी म्हणती । शेवटीं आपणचि मरोनि जाती । कित्येक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥ ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काय द्यावी उपमा । ब्रह्मादिकांपासोनी आम्हां । आश्रयचि ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके पृथ्वीस्तवननिरू- पणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. आपस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां सकळांचें जन्मस्थान । सकळ जीवांचें जीवन । जयास आपोनारायण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥ पृथ्विस आधार आवरणो- दक । सप्तसिंधूंचें शुद्धोदक । नाना मेघांचें मेघोदक । भूमंडळीं चालिलें ॥ २ ॥ नाना नद्या नाना देशीं । वाहत मिळाल्या सागरासी । लहान थोर पुण्यराशी । अगाध महिमे ॥ ३ ॥ नद्या पर्वताहून कोसळल्या । नाना सांकडींमध्यें रिचवल्या । धबधबां खळखळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥ कूपें वाँपी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें । निर्मळें उचंबळती नीरें । नाना १. स्थळें. २. महाभुजंगानें. ३. शिरल्या. ४. आड. ५. विहिरी.