दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 396, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६ वा.] अंतरात्मा. ३६१ विवरविवरोनी ॥ ४१ ॥ द्वैतइच्छा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं । भूमंडळीं आणि मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥ येथें मोठा झाला साक्षेप । फिटला श्रोत्यांचा आक्षेप । जे प्रकृतिपुरुषांचें रूप । निवडोन गेलें ॥४३॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके महद्भूतस्तवननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. अंतरात्मा. श्रीगणेशाय नमः ॥ नमूं गणपती मंगलमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती । लोक भजती स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥ नमूं वैखरी वागीश्वरी¹ । अभ्यंतरीं प्रकाश करी । नाना भरोवेरीं² विवरी । नाना विद्या ॥ २ ॥ स- कळ नामामध्यें नाम । रामनाम उत्तमोत्तम । श्रम जाऊन विश्राम । चंद्र³- मौळी पावला ॥ ३ ॥ नामाचा महिमा थोर । रूप कैसें उत्तरोत्तर । परात्पर परमेश्वर । त्रैलोक्यधर्ता ॥ ४ ॥ आत्माराम चहूंकडे । लोक वावडे जिकडे तिकडे । देह पडे मृत्यु घडे । आत्म्याविण ॥ ५ ॥ जीवात्मा शिवात्मा परमा- त्मा । जगदात्मा विश्वात्मा गुह्यात्मा । आत्मा अंतरात्मा सर्वात्मा । देव दान- व मानवीं ॥ ६ ॥ सकळ मार्ग बोलती चालती । अवतार पंगतीची गती । आत्म्याकारितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥ नादरूप ज्योतिरूप । सूक्ष्म- रूप सत्तारूप । चैतन्यरूप सुखरूप । द्रष्टारूप जाणिजे ॥ ८ ॥ नरोत्तम वीरोत्तम । पुरुषोत्तम रघूत्तम । सर्वोत्तम उत्तमोत्तम । त्रैलोक्यवासी ॥ ९ ॥ नाना खटपट आणि चटपट । नाना लटपट आणि झटपट । आत्मा नसतां सर्व सपाट । चहूंकडे ॥ १० ॥ आत्म्याविण वेडें कुडें⁴ । आत्म्याविण मडें बापुडें । आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥ आत्मज्ञानी समजे मनीं । पाहे जनीं आत्म्यालागुनी । भुवनीं आणि त्रिभुवनीं । आत्म्याविण बोस ॥ १२ ॥ परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार । आत्म- याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥ सर्वांगीं सिद्ध सावध । नाना भेद नाना वेध । नाना खेद आणि आनंद । तेणेंचिकारितां ॥ १४ ॥ रंक अथ- वा ब्रह्मादिक । एकचि चालवी अनेक । पाहावा नित्यानित्यविवेक । को- १. सरस्वती. २. विस्तारानें. ३. शंकर. ४ खोटें.