दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 403, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३६८ श्रीदासबोध. [ दशक कार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥ अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणि सदोदित । असंत१ नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥ परब्रह्म तें अविनाश । जैसें आकाश अवकाश । न तुटे न फुटे सावकाश । जैसें तैसें ॥ ३ ॥ तेथें ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण । तेथें अखंड निर्गुण । निर२व- लंबी ॥ ४ ॥ तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोख प्रकाश । उपाधी- वेगळें एक । निरूपाधि ब्रह्म ॥ ५ ॥ निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य ऐसें कल्पिलें । गुणसमानत्वें झालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥ गगनीं आली अभ्रच्छाया३ । तैशी जाणिजे मूळमाया । उद्भव आणि विलया । वेळ नाहीं ॥ ॥ ७ ॥ निर्गुणीं गुणविकार । तोचि षड्गुणेश्वर । अर्धनारी नटेश्वर । तयासि म्हणिजे ॥ ८ ॥ आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति । तेथून पुढें नाना व्यक्ती । निर्माण झाल्या ॥ ९ ॥ तेथून पुढें शुद्ध सत्व । रजतमाचें गूढत्व । तयासि म्हणिजे महत्तत्व । गुण४क्षोभिणी ॥ १० ॥ मुळीं असेचि ना व्यक्ती । तेथें कैंची शिवशक्ती । ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान असावें ॥ ११ ॥ ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड । अधोध्वं पाहतां निवाड । कळों येतें ॥ १२ ॥ बीज फोडून आणिलें मना । तेंथें फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥ फळ फो- डितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंड- ब्रह्मांडीं ॥ १४ ॥ नरनारी दोन्ही भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध । मुळीं न- सतां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥ नाना बीजरूप कल्पना । तींत काय एक असेना । सूक्ष्म म्हणोन भासेना । एकाएकीं ॥ १६ ॥ स्थूळाचें मूळ तें वासना । ते वासना आधीं दिसेना । स्थूळा वेगळें अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥ कल्पनेची सृष्टि केली । ऐशीं वेदशास्त्रं बोलिलीं । दिसेना म्हणोन मिथ्या केलीं । न पाहिजेत कीं ॥१८॥ पडदा एकेक जन्माचा । तेथें विचार कळेल कैंचा । परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥ नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । एकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ २० ॥ नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे । ब्रह्मांडबीज ॥२१॥ नवरीचें मन नवऱ्यावरी । नवऱ्याचें मन नवरीवरी । ऐशी १. असत्. २. आश्रयरहित. ३. ढगांची सांवली. ४. त्रिगुणांस चाळविणारी.