दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 405, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंनाना परीक्षा करणें । विवेकी मनुष्यास बोलणें । सावधानें असावें ॥ ५ ॥ जैसें लाखोलीचें धान्य । निवडोन वेंचिंतां होतें मान्य । सगट मोजितां अ- मान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥ एकांतीं नाजुक कारभार । तेथें असावें अति त- त्पर । त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रंथीं ॥ ७ ॥ काहण्या कथा गोष्टी पवाडें । नाना अवतारचरित्रें वाड । त्यां समस्तांमध्यें जाड । अध्यात्मवि- द्या ॥ ८ ॥ गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काय हातासि आलें । म्हणती पुण्य प्राप्त झालें । तरी तें दिसेना कीं ॥ ९ ॥ तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रची- तीचा विचार । कळतां अनुमानाचा संहार । होत जातो ॥ १० ॥ मोठे मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले । त्या आत्म्याचा महिमा बोले । ऐसा कवण ॥ ११ ॥ युगानुयुग एकटा एक । चालवितो तिन्ही लोक । त्या आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥ प्राणी आले येऊन गेले । ते जैसे जैसे वर्तले । ते वर्तणुकेचें कथन केलें । इच्छेसारिखें ॥ १३ ॥ जेथें आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट । आत्म्याविण बापुडें काष्ठे । काय जाणे ॥ १४ ॥ ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं या समान । सृष्टी- मध्यें विवेकी जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥ पृथ्वी आणि आप तेज । यांचा पृथ्वीमध्यें समज । अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥ वायूपासून पैलीकडे । जो कोणी विवेकें पवाडे । जवळींच आत्मा सांपडे । तया पुरुषासी ॥ १७ ॥ वायुप्रकाशैं गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया । सूक्ष्मरूपें प्रतीत येया । कठिन आहे ॥ १८ ॥ मायादेवीच्या धांदली । सूक्ष्मीं कोण मन घाली । समजला त्याची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥ मूळ- माया चौथा देह । झाला पाहिजे निःसंदेह । देहातीत होऊन राहे । धन्य तो साधु ॥ २० ॥ विचारें ऊर्ध्व चढती । तयासी ऊर्ध्वगती । येरां सकळां अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥ पदार्थ चांगले दिसती । परी ते सर्वैचि नासती । अतोभ्रष्टस्ततोभ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥ या कारणें प्रकृति- ज्ञान । नाना जिनसांचें अनुमान । सर्व सांडूनि निरंजन । धुंडीत जावें ॥ २६ ॥ अष्टांगयोग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञानें । त्याहून थोर आ- १. पोवाडे. २. लांकडासारखें निर्जीव शरीर. ३. वायूचा उद्भव. ४. सद्गति. ५. याला मुकला व त्यालाही मुकला. ६. महदादि तत्त्वांचें ज्ञान.