दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 41, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें६ श्रीदासबोध. [ दशक सिद्धांचे अंतरीं संचली । चतुर्विधें प्रकारें ॥ १३ ॥ तिहीं वाचां अंतरीं आलें । तें वैखरीया प्रगट केलें । म्हणोनि कर्तृत्व जितुकें झालें । तें शारदा- गुणें ॥ १४ ॥ जे ब्रह्मादिकांची जननी । हरि हर जियेपासुनी । सृष्टिरचना लोक तिन्ही । विस्तार जियेचा ॥ १५ ॥ जे परमार्थाचें मूळ । नातरी सद्धिद्याच केवळ । निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६ ॥ जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं । जे सिद्धांचे अंतःकरणीं । समा- धिरूपें ॥ १७ ॥ जे निर्गुणाची^२ ओळखण । जे अनुभवाची खूण । जे व्यापक- पणें संपूर्ण । सकळां घटीं ॥ १८ ॥ शास्त्रें पुराणें वेद श्रुती । अखंड जियेचें स्तवन करिती । नाना रूपें जियेस स्तविती । प्राणिमात्र ॥ १९ ॥ जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरुपमाची उपमा । जियेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २० ॥ नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयांची बुद्धी । जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञप्तिमात्र ॥ २१ ॥ जे हरिभक्तांची निजभक्ती । जे अंतर्निष्ठांची अंतरस्थिती । जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायुज्यता ॥ २२ । जे अनंत माया वैष्णवी । नकळे नाटक लाघवी । जे थोरथोरांस गोंवी । जाणतपणें ॥ २३ ॥ जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें । जें जें मनास भासलें । तितुकें रूप जियेचें ॥ २४ ॥ स्तवन भजन भक्तिभाव । जियेवांचूनि नाहीं ठाव । या वचनाचा अभिप्राय । अनुभवी जाणती ॥ २५ ॥ म्हणोनि थोराहूनि थोर । जे ईश्वराची ईश्वर । तिये माझा नम- स्कार । तदंशेंचि आतां ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथम- दशके शारदास्तवनं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. सद्गुरुस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शां शकेना तें स्वरूप मज अज्ञाना । काय कळे ॥ १ ॥ न कळे न कळे नेति^४ नेती^४ । ऐसें बोलतसे श्रुती । तेथें मज मूर्खाची मती । पवाडेलें कोठें ॥ २ ॥ मज न कळे हा विचार दुरून माझा नमस्कार । गुरुदेवा पैलपार । पाववी मज ॥ ३ ॥ होती १. परा, पश्यंती, मध्यमा, आणि वैखरी. २. निराकार ब्रह्माची. ३. विष्णूची. ४. हें नव्हे, हें नव्हे. ५. शिरेल.