दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 419, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३८४ श्रीदासबोध. [ दशक ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके बहुदेवस्थान- निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. सर्वज्ञसंग. श्रीगणेशाय नमः ॥ नेणपणें झालें तें झालें । झालें तें होऊनि गेलें । जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥ जाणत्याची संगति धरावी । जा- णत्याची सेवा करावी । जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळूहळू ॥ २ ॥ जाण- त्यापाशीं लिहों शिकावें । जाणत्यापाशीं वाचों शिकावें । जाणत्यापाशीं पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥ जाणत्यास करावे उपकार । जाणत्या ऐसें झिज- वावें शरीर । जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥ जाणत्याचे संग- तीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें । जाणत्याचे संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥ ५ ॥ जाणत्यापाशीं गावें गाणें । जाणत्यापाशीं वाजवणें । नाना आलाप शिकणें । जाणत्यापाशीं ॥ ६ ॥ जाणत्याच्या कासेस लागावें । जाणत्याचें औषध घ्यावें । जाणता सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥ जाणत्यापाशीं परीक्षा¹ शिकणें । जाणत्यापाशीं तालीम करणें । जाणत्यापाशीं पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥ जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें । जाणत्याचें ध्यान ध्यावें । नाना प्रकारीं ॥ ९ ॥ जाणत्याच्या कथा शिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या । जाणत्याच्या गोष्टी विव- राव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥ जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे । जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११ ॥ जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग । जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्या- सावे ॥ १२ ॥ जाणत्याचा साक्षेप² घ्यावा । जाणत्याचा तर्क जाणावा । जा- णत्याचा उल्लेख³ समजावा । न बोलतांची ॥ १३ ॥ जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण । जाणत्याचें निरूपण । ऐकत जावें ॥ १४ ॥ जाणत्याचीं कवित्वें शिकावीं । गद्य पद्यें ओळखावीं । माधुर्य वचनें सम- जावीं । अंतर्यामीं ॥ १५ ॥ जाणत्याचे पाहावे प्रबंध⁴ । जाणत्याचे वचन- भेद⁵ । जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥ जाणत्याची तीक्षणता । १. कौशल्य. २. प्रयत्न. ३. अभिप्राय. ४. कविता. ५. वाक्चातुर्य.