दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 429, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३९४ श्रीदासबोध. [ दशक सुद्धा कांहींच नेणे । म्हणोनि विवेकी शहाणे । अंतर शोधिती ॥ १५॥ विवेका- विणें जो भाव । तो भावचि अभाव । मूर्खास प्रतिमादेव । ऐसें वचन ॥ १६ ॥ पाहत समजत शेवटास गेला । तोचि विवेकी म्हणावा भला । तत्त्वें सांडूनि पावला । निरंजनीं १ ॥ १७ ॥ येर जें आकारासि येतें । तें अव- घें नासोन जातें । मग गलबल्या वेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ चंचळ देव निश्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम । प्रत्ययज्ञानें निष्भ्रम । होइजेतें ॥ १९ ॥ प्रचीतीविण जें केलें । तें अवघें व्यर्थ गेलें । प्राणी कष्टकष्टेंचि मेले । कर्मेकचाटें ॥ २० ॥ कर्मावेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें । विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥ कांहीं अनुमानलें विचारें । देव आहे जगदंतरें । सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥ सगुण पाहतां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला । संगत्यागें मोकळा झाला । वस्तुरूप ॥ २३ ॥ परमेश्वरीं अनुसंधान । लावितां होइजे पावन । मुख्य ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं विवरणें । पाहावीं सुचित्त अंतःकरणें । नित्यानित्यविवेकश्रवणें । जगदुद्धार ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके अंतर्देवनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. निद्रा. श्रीगणेशाय नमः ॥ वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विलास । निद्रा आलिया सावकाश । जाणार नाहीं ॥ १ ॥ निद्रेनें व्यापिली काया । आळस अंगमोडे जांभया । तेणें करितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥ कड- कडां जांभया येती । चटाचटां चुटक्या वाजती । डकडकां डुलक्या येती । सावकाश ॥ ३ ॥ एकाचे डोळे झांकती । एकाचे डोळे लागती । एक ते वचकून पाहती । चहूंकडे ॥ ४ ॥ एक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले । हुडकांचे तुकडे झाले । शुद्ध नाहीं ॥ ५ ॥ एक टेंकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले । एक उताणे पसरले । सावकाश ॥ ६ ॥ कोणी सुर- कुंडी घालिती । कोणी कानवैंडे निजती । कोणी चक्रीं फिरती । चहूंकडे १. उपाधिशून्य ब्रह्मपदीं. २. एका जातीचे वाद्य, त्याचे. ३, कुशीवर.