दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 439, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४०४ श्रीदासबोध. [ दशक प्याच्या सुखें सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उ- दंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैशी अवघ्यांची चिंता करी । महापुरुष ॥ २४ ॥ जयास कोणाचें सोसेना । तयाची निष्किंचन वासना । धिक्कारितां धिकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥ मिथ्या श- रीर निंदिलें । तरी याचें काय गेलें । झाल्यास आणि जिंकिलेँ । देहबुद्धीनें ॥ २६ ॥ हैं तों अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तरी उ- त्तमगुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गु- णास प्राणी खेदे । तीक्ष्णबुद्धि लोक साधे । काय जाणती ॥ २८ ॥ लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलिया लोकांचे प्रचीती । मग ते लोक पाठी रा- खिती । नाना प्रकार्री ॥ २९॥ बहुतांसि वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार । धीर उदार गंभीर । महापुरुष ॥ ३० ॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तैं समर्थांचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि झालें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके सदैवलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. देहमान्य. श्रीगणेशाय नमः ॥ मातीचा देव धोंड्याचा देव । सोन्याचा देव रु- प्याचा देव । कांस्याचा देव पितळेचा देव । तांब्याचा देव चित्रलेप ॥ १ ॥ रुईच्या लांकडाचे पाँवळाचे देव । बाण तांदळे नर्मदेचे देव । शालग्राम काश्मीरदेव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥ ताम्रनाणीं हेमेंनाणीं । कोणी पू- जिती देवतार्चनीं । चक्रांकित चक्रतीर्थांहूनी । घेऊनि येती ॥ ३ ॥ उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद । आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥ परी त्या सकळांचेंहि कारण । मुळीं पाहावें स्मरणं । तया स्मरणाचे अंश जाण । नाना दैवतें ॥ ५ ॥ मुळीं द्रष्टा देव तो एक । त्याचे झाले अनेक । समजोन पाहतां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥ देहावेगळी भक्ति फावेना । देहावेगळा देव पावेना । या कारणें मूळ भजना । देहचि आहे ॥ ७ ॥ देह मुळींच केला वाव । तरी भजनास कैचा ठाव । म्हणोनि भजनाचा उपाव । देहात्मयोगें ॥ ८ ॥ देहाविण देव कैसा भजावा । देहा- १. दरिद्री. २. निराळा. ३. सोन्याचीं नाणीं. ४. स्फूर्ति.