दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 441, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४०६ श्रीदासबोध. [ दशक स्थिति गती । कळतां चुके अधोगती । सद्गुरुवचनें सद्गती । तत्काळ होते ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके देहमान्य- निरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. बुद्धिवाद. श्रीगणेशाय नमः ॥ परमार्था आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं । कां जे विवराविवरों चुकी । पडोंच नेदी ॥ १ ॥ जो जो संदेह वाटे मना । तो तो कदापि करीना । आदि अंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥ स्वतां निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना । कठिण आहे जनार्दनां १ । राजी राखणें ॥ ३ ॥ कोणी दाटून उपदेश देती । कोणी मध्यवर्ती घालिती । ते सहजचि हळु पडती । लालुचीनें ॥ ४ ॥ जयास सांगावा विवेक । तो जा- णावा प्रतिकुंचकें २ । पुढें पुढें नाशक । कारभार होतो ॥ ५ ॥ भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती । वोळखीच्या लोकांत महंती । मां- डूंचि नये ॥ ६ ॥ पहिले दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे । अविवेकी ते जैसे तैसे । मिळती तेथें ॥ ७ ॥ भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हा हि फटकळ विचारु । नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥ प्रगट विवेक बोलेना । झांका तापा करी जना । मुख्य निश्चय अनुमाना । आ- णूंच नेदी ॥ ९ ॥ हुकीसारिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे । दूर दृष्टीनें पुरे । साधु नव्हती ॥ १० ॥ कोणास कांहींच न मागावें । भगवद्भजन वाढवावें । विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥ परांतर रक्षायाचीं कामें । बहुत कठिण विवेकवर्मे । स्वइच्छेनें स्वधर्मे । लोकराहाटी ॥ १२ ॥ आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला । नीच यातीनें नासला । समुदाय ॥ १३ ॥ ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । म- ळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥ अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी ।
१. सर्व जनांच्या अंतरात्म्यास. २. प्रतिकूळ,