दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 460, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२० वा. ] आत्मा. ४२५ कांहीं उत्तम गुण । तितुके आत्मयाचें लक्षण । बरें वाईट तितुकें जाण । आत्मयाचकरितां ॥ ७ ॥ शुद्ध¹ आत्मा उत्तम गुणीं । सबळ² आत्मा अवल- क्षणीं । बरें वाईट अवघी करणी । आत्मयाची ॥ ८ ॥ नाना साभिमान धरणें । नानाकृति सृष्टि करणें । नाना शापडःशाप लक्षणें । आत्मयाचेनी ॥ ९ ॥ पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्त्वांचा पिंड शोधावा । तत्त्वें शोधितां पिंड अघवा । कळों येतो ॥ १० ॥ जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्म- याचा । निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैंचा । जेथें तेथें ॥ ११ ॥ निश्चळ चंचळ आणि जड । पिंडीं करावा निवाड । प्रत्ययावेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १२॥ पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो । देह जड हा पडतो । देखतदेखतां ॥१३॥ जड तितुकें पडलें । चंचळ तितुकें निघोन गेलें । जडचंच- ळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १४ ॥ निश्चळ आहे सकळां ठायीं । हें तों पाहणें नलगे कांहीं । गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १५ ॥ जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड । जड चंचळ जातां जाड । पर- ब्रह्मचि आहे ॥ १६ ॥ महाभूतांचा खंबींर³ केला । आत्मा घालून पुतळा झाला । चालिला सृष्टीचा गलबला । येणें रीती ॥ १७ ॥ आत्मा माया⁴- विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी । प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १८ ॥ ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड । शोधून पा- हतां जड । कांहींच नाहीं ॥ १९ ॥ गगनास खंडितां न ये । गगनाचें ना- सेल काय । जरी झाला महाप्रलय । सृष्टिसंहार ॥ २० ॥ जें संहारामध्यें सांपडलें । सहजचि नाशवंत झालें । जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २१ ॥ न कळतां वाटे कोडें । कळतां अवघें दिसे उघडें । म्हणोनि ए- कांतीं निवाडें । विचार पाहावा ॥ २२ ॥ मिळतां प्रत्ययाचे संत । एकांता- परीस एकांत । केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २३ ॥ पाहिल्या- वेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं । विवेक पाहतां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २४ ॥ गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उ- डालें । आत्म्याकरितां दृश्य झालें । उडेल तैसें ॥ २५ ॥ मुळापासून शेवट- वरी । विवेकी विवेकें विवरी । तो निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २६ ॥ १. निरुपाधिक. २. शबल, सोपाधिक आत्मा; जीव. ३. मूर्ति. ४. मायेचे विकार.