दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 50, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१ द. ] परमार्थस्तवन. १५ भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती । ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८ ॥ कलौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ । कथा- श्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य- संवादे प्रथमदशके सभावर्णनं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. परमार्थस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां स्तवूं हा परमार्थ । जो साधकांचा निज- स्वार्थ । नातरी समर्थांमध्यें समर्थ । योग हा ॥ १ ॥ आहे तरी परम सु- गम । परी जनासि जाहला दुर्गम । कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २ ॥ नाना साधनांचें उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३ ॥ आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टीस न पडे । उदास परी एकीकडे । पहातां दिसेना ॥ ४ ॥ आकाशमार्गै गुप्त पंथ । जाणती योगी समर्थ । इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५ ॥ साराचेंहि निजसार । अखंड अक्षय अपार । नेऊं न शकती तस्कर । कांहीं केल्या ॥ ६ ॥ तयासि नाहीं राजभय । अथवा नाहीं अग्निभय । अथवा श्वापदभय । बोलोंच नये ॥ ७ ॥ परब्रह्म तें हालवेना ! अथवा ठावही चुकेना । कालांतरीं चळेना । जेथींचें तेथें ॥ ८ ॥ ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे । अथवा नव्हे अधिक उणें । बहुतां काळें ॥ ९ ॥ अथवा तें बसवटेना । अथवा अदृश्य होईना । नातरी पाहतां दिसेना । गुरुअंजनेंविण ॥ १० ॥ मागां योगिये समर्थ । त्यांचांहि निजस्वार्थ । त्यासि बोलिजे परमार्थ । परम गुह्य म्हणोनि ॥ ११ ॥ ज्यांहीं शोधून पाहिला । त्यांसीच अर्थ सांपडला । येरां असोनि अलभ्य झाला । जन्मोजन्मीं ॥ १२ ॥ अपूर्वता या परमा- र्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्यूची । आणि पदवी सायुज्यतेची । सन्निधचि लाभे ॥ १३ ॥ माया विवेकें मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४ ॥ ब्रह्मीं भासलें उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड । पंचभूतांचें थोतांड । तुच्छ वाटे ॥ १५ ॥ प्रपंच वाटे लटिका । माया वाटे झापाणिकों । शुद्ध आत्मा विवेका-। अंतरीं आला ॥ १६ ॥ ब्रह्मस्थिति बा- १. मलिष्ट. २. सद्गुरूच्या उपदेशावांचून. ३. कृत्रिम, पोकळ.