दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 63, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८ श्रीदासबोध. [ दशक तस्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥ धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजटें¹ । धोंटें उद्भट लंपट । बटवाळै² कुबुद्धि ॥ ३० ॥ मारेकरी वरपेकॅरी। दरवडेकरी खाँणोरी⁵ । मैंद भौंदु परद्वारी । भुरेरेंकरी⁶ चेटकी ॥ ३१ ॥ निःशंक निला- जिरा कैलभंट⁷ । टोणपा लौंद घट उद्भट । ठंस⁸ ठोंबसें⁹ खटनट । जगभांड विकारी¹⁰ ॥ ३२ ॥ अधीर आळकीं अनाचारी । अंध पंगु खोकलेकरी । थौंटा बधिर दभेकरी । तरी ताठा न सांडी ॥ ३३ ॥ विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन । शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीनँ¹¹ भिकारी ॥ ३४ ॥ बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन । लक्षणहीन लावण्यहीन । अंगहीन वि- पारैँ¹² ॥ ३५ ॥ युक्तिहीन बुद्धिहीन । क्रियाहीन सत्वहीन । आचारहीन विचारहीन । विवेकहीन संशयी ॥ ३६ ॥ भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन । शांतिहिन क्षमाहीन । सर्वहीन क्षुल्लक ॥ ३७ ॥ समय नेणे प्रसंग नेणे । प्रयत्न नेणे अभ्यास नेणे । आर्जव नेणे मैत्रिकी नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥ असो ऐसे नाना विकार । कुलक्षणांचे कोठार । ऐसे कुविद्येचे नर । श्रोतीं वोळखावे ॥ ३९ ॥ ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागाचि करणें । अभिमानें तैंन्हेँ¹³ भरणें हें विहित नव्हे ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके कुविद्यालक्षणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. भक्तिनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ नाना सुकृतांचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याही- मध्यें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥ नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहीवरी संध्या स्नान । सद्वासना भगवद्भजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥ भगवद्भक्ति हे उत्तम । त्याहीवरी सत्समागम । काळ सार्थक हाचि परम लाभ जाणावा ॥३॥ प्रेमप्रीतीचा सद्भाव । आणि भक्तांचा समुदाय । हरि- कथा महोत्सव । तेणें प्रेम दुणावे ॥ ४ ॥ नरदेहीं आलिया एक । कांहीं करावें सार्थक । जेणें पाविजे परलोक । परम दुर्लभ जो ॥ ५ ॥ विधियुक्त १. वात्रट. २. कुभांडी. ३. भ्रष्ट. ४. लुटारू. ५. काळीजखाऊ. ६. भुरळ पाडणारा ७. कळ काढणारा. ८. ताठर. ९. ठोंब्या. १०. हाबरा. ११. दुर्दैवी. १२. कुरूप. १३. इट्टांस पेटणें.