दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 78, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपुरुषें ॥ ४० ॥ इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें । श्रोतीं उदास न व्हावें । बहु बोलिलों म्हणोनी ॥ ४१ ॥ परंतु हीं लक्षणें न घेतां । अवलक्षणें बाष्कळता। तेणें त्यास पढतमूर्खता। येऊ पाहे ॥४२॥ त्या पढतमूर्खांचें लक्षण । पुढीलिये समासीं निरूपण । बोलिलें असे साव- धान । होऊनि ऐका ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय- दशके विरक्तलक्षणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १० पढतमूर्खलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खा अंगीं चातुर्य बाणे । आतां ऐका शहाणे । असोन मूर्ख ॥ १ ॥ तया नांव पढतमूर्ख । श्रोतीं न मानावें दुःख । अवगुण त्यागितां सुख । प्राप्त होय ॥ २ ॥ बहुश्रुत आणि- व्युत्पन्न । प्रांजळे बोले ब्रह्मज्ञान । दुराशा आणि अभिमान । धरी तो एक पढतमूर्ख ॥ ३ ॥ मुक्तक्रियां प्रतिपादी । सगुणभक्ति उच्छेदी । स्वधर्म आणि साधन निंदी । तो एक पढतमूर्ख ॥ ४ ॥ आपुलेनि ज्ञातेपणें । सक- ळांस शब्द ठेवणें । प्राणिमात्राचें पाहे उणें । तो एक पढतमूर्ख ॥ ५ ॥ शि- ष्यांसि अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे । ज्याचेनि शब्दें मन मोडे । तो एक पढतमूर्ख ॥ ६ ॥ रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिल अंतःकरणीं । वैभव देखोनि वाखाणी । तो एक पढतमूर्ख ॥ ७ ॥ समूळ ग्रंथ पाहिल्या- विण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां पाहे अवगुण । तो एक पढत- मूर्ख ॥ ८ ॥ लक्षणें ऐकोनि मानी वीट । मत्सरें करी खटपट । नीति नायके उद्धट । तो एक पढतमूर्ख ॥ ९ ॥ जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे । क्रियां शब्दांस अंतरे । तो एक पढतमूर्ख ॥ १० ॥ वक्ता अधिकारेंविण । वक्तृत्वाचा करी शीण । वचन जयाचें कठिण । तो एक पढतमूर्ख ॥ ११ ॥ श्रोता बहुश्रुतपणें । वक्त्यासि आणी उणें । वाचाळपणाचेनि गुणें । तो एक पढतमूर्ख ॥ १२ ॥ दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापाशीं । ऐसें कळेना जयासी । तो एक पढतमूर्ख ॥ १३ ॥ अभ्यासाचेनि गुणें । सकळ १. स्पष्ट. २. वेदाधाररहित कर्म, स्वैर वर्तन. ३. भलत्याच नादात शिरतो. ४. आचरणास व बोलण्यास मेळ पडत नाहीं. ५. दुसऱ्यांस.