भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 84, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 84

तेणें दुःखें आंदोळे । रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७ ॥ शरीर रक्षितां न ये । घडती नाना अपाय । खोडी आधांतरीं होय । अवयवहीन बालक ॥ ८ ॥ अथवा अपाय चुकले । पूर्व पुण्य पुढें ठाकलें । मातेसि वोळखूं लागलें । दिवसेंदिवस ॥ ९ ॥ क्षणभरी मातेसि न देखे । तरी आक्रंदोनि रुदन करी दुःखें । ते समयीं मातेसारिखें । आणिक कांहींच नाहीं ॥ १० ॥ आस करूनि वासें पाहे । मातेविण कदा न राहे । वियोग पळ- मात्र न साहे । स्मरण झाल्यानंतर ॥ ११ ॥ जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीनें अवलोकिलें । तरी न वचे बुझाविलें । मातेवांचुनी ॥ १२ ॥ कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण । तरी नाहीं ती- समान । भूमंडळीं कोणी ॥ १३ ॥ ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसें उणें । रागें परतें केलें तिणें । तरी आक्रंदोनि मिठी घाली ॥ १४ ॥ सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी । अति प्रीति तये काळीं । मातेवरी लागली ॥ १५ ॥ तंव ते मातेसि मरण आलें । प्राणी पोरटें जाहलें । दुःखें झुरणी लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६ ॥ आई पाहतां दिसेना । दीनरूप पाहे जना । आस लागलीसे मना । आई येईल म्हणोनी ॥ १७ ॥ माता म्हणोनि मुख पाहे । तंव ती आपुली माता नोहे । मग हिंव- सेंलेंसें राहे । दैन्यवाणें ॥ १८ ॥ मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख झालें। देहहि क्षीणत्व पावलें । अतिशयेंसी ॥ १९ ॥ अथवा माताहि वांचली । माय- लेंकरां भेटी झाली । बाळदशा ते राहिली । दिवसेंदिवस ॥ २० ॥ बाळपण जाहलें उणें । दिवसेंदिवस होय शहाणें । मग तें मायेचें अत्यंत पेखणें । होतें तें राहिलें ॥ २१ ॥ पुढें लोभ लागला खेळाचा । कळप मेळवी पोरांचा । आल्या गेल्या डौयाचा । आनंद शोक वाहे ॥ २२ ॥ मायबापें शिकविती पोटें । तयाचें दुःख परम वाटे । चट लागली न सुटे । संगति लेंकुरांची ॥ २३ ॥ लेंकुरांमध्यें खेळतां । नाठवे माता आणि पिता । तंव तेथेंहि अव- चिता । दुःख पावला । २४ ॥ पडिले दांत फुटला डोळा । मोडला पाय झाला खुळां । गेला माज अवकळा । ठाकोनि आली ॥ २५ ॥ निघाल्या देवी १. कांपतो. २. मध्येंच. ३. वाट. ४. दूर. ५. हिरमुसलेंसें. ६. भोळा, लळा. ७. डावांचा. ८. पोटाच्या काळजीमुळे. ९. लंगडा.