दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 89, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५४ श्रीदासबोध. [ दशक अतिप्रीती । दोघेंहि क्षण एक न विसंबती । कांहीं जाह्या आक्रंदती । दीर्घ- स्वरें ॥ ३५ ॥ ऐसीं ती परम दुःखित । पूजित होती नाना दैवत । तंव तेंहि मेलें अवचित । पूर्वपापेंकरूनी ॥ ३६ ॥ तेणें बहुत दुःखी झाले । घरीं अंधारें पडिलें । म्हणती आम्हांस कां ठेविलें । देवें वांझ करुनी ॥ ३७ ॥ आम्हां द्रव्य काय करावें । तें जावें परी अपत्य व्हावें । अपत्यालागीं व्यजावें । लागे सर्व ॥ ३८ ॥ वांझपण संदिसें¹ गेलें । तों मरतवांझ नांव पडलें । तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९ ॥ आमुची वेली कां खुंटली । हा हा देवा वृत्ति² बुडाली । कुळस्वामिनी कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४० ॥ आतां लेंकराचें मुख देखेन । तरी आनंदें रोंडी³ चालेन । आणि गळही टोचीन । कुळस्वामिनीपाशीं ॥ ४१ ॥ आई भुल्या करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा⁴ । वेसंनीं⁵ घालीन माझा । मनोरथ पुरवीं ॥ ४२ ॥ बहुत देवांस नवस केले । बहुत गोसांवी धुंडिले । गटगटां गिळूं लागले । सगळे विंचू ॥ ४३ ॥ केले समंधाचे सायास । राहाणें⁶ घातलें बहुवस । केलें नारिकेलें⁷ ब्राह्मणांस । आम्रदानें दिधलीं ॥ ४४ ॥ केलीं नाना कौटिलें⁸ । पुत्रलोभें केलीं ढाळें⁹ । तरी अदृष्टें¹⁰ फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५ ॥ वृक्षाखालें जाऊनि नाहाती । फळतीं झाडें करपती । ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६ सांडोनि सकळ वैभव । त्यांचा वारया वेंधलों¹¹ जीव । तंव तो पावला खंडेराव । आणि कुळस्वामिनी ॥ ४७ ॥ आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती । सावध होऊनि श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके द्वितीयसंबंधनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. संपत्तिवेध. श्रीगणेशाय नमः ॥ लेंकुरें उदंड झालीं । तंव ते लक्ष्मी निघोन गेली । बापुडीं भिकेस लागलीं । कांहीं खावयासी मिळेना ॥ १ ॥ लेंकुरें
१. नुकतेंच. २. वतन. ३. धगधगीत निखाऱ्यांची खाई. ४. केराचा ढीग, केरोपंत. ५. नथणी ६. अंगांत दैवत आणून बोलविलें. ७. नारळ. ८. मंत्रतंत्र, जारणमारणादि साधनें. ९. क्षुद्र साधनें. १०. नशीब. ११. झुरू लागला.