दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 93, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५८ श्रीदासबोध. [ दशक ५. कांताहरण. श्रीगणेशाय नमः ॥ पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला आपुल्या व्यासंगासी । आपुल्या जीवें सोसी । नाना श्रम ॥ १ ॥ ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर । पुढें दोनी चारी संवत्सर । द्रव्य मिळविलें ॥ २ ॥ सर्वंचि आला देशासी । तों अवर्षण पडलें देशीं । तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाहले ॥ ३ ॥ एकांच्या बैसल्या अमृतकळौ । एकांस चंद्री ला- गेली डोळां । एक कांपती चळचळां । दैन्यवाणी ॥४॥ एक दीनरूप बैसलीं । एक सुजलीं आणि मेलीं । ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५ ॥ तेणें बहुत दुःखी झाला । देखोनिदां उमर्डे आला । प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणें ॥ ६ ॥ तंव तीं अवघीं सावध झालीं । म्हणती बाबा जेवूं घालीं । अन्नालागीं मिटंकलीं । झर्डी घालिती ॥ ७ ॥ गांठोडें सोडोनि पाहती । हातां पडलें तेंच खाती । कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनियां ॥ ८ । तांतडी तांतडी जेऊं घाली । तों जेवितां जेवितां कांहीं मेलीं । कांहीं होतीं धांदावलीं । तींही मेलीं अजीर्णे ॥ ९ ॥ ऐसीं बहुतेंक मेलीं । एक दोन मुलें उरलीं । तींही दैन्यवाणीं झालीं । आपुले मातेवांचूनी ॥१०॥ ऐसें अवर्पण आलें । तेणें घरचि बुडालें । पुढें देशीं सुभिक्षं झालें । अति- शयेंसी ॥ ११ ॥ लेंकुरा नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेनि हातें । बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२ ॥ लोकीं भरीस घातलें । पुनः मागुतें लग्न केलें । द्रव्य होतें तें वोंचिलें । लग्नाकारणें ॥ १३ ॥ पुन्हा विदेशासि गेला । द्रव्य मेळवूनि आला । तंव घरीं कलहो लागला । साव- त्र पुत्रांसी । १४ ॥ स्त्री झाली न्हाती धुती । पुत्र देखों न शकती । भ्रता- राची गेली शक्ती । वृद्ध झाला ॥ १५ ॥ सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें । वनिता अतिप्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६ ॥ किंतु बैसला मना । एके ठाईं पटेना । म्हणोनियां पांचजणां । मेळविलें ॥ १७ ॥ पांचजण वांटे करिती । तों ते पुत्र नायकती । निवाडा नव्हेचि अंतीं । भांडण लागलें ॥ १८ ॥ बापलेंकांचें भांडण झालें । लेंकीं बापास मारिलें । १. उद्योगास. २. गालफडा. ३. ताटकळा आली. ४. गहिवर. ५. आशाळलेलीं. ६. उद्व ईनें. ८. मुकेलेलीं. ९. सुकाळ. १०. बायको. ११. अविश्वास.