सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 11, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंएकोणीस पुढं जी वहारीची वर्णनं केली आहेत, ती बहुधा त्याच्या स्वानुभवाचीच असावीत तुकोबांचे जनक बोल्होबा व आई कनकाई यांचीही विठ्ठलाचरणी असीम भक्ती होती आषाढी-कार्तिकीची वारी घरी चालू होती दानधर्म, वैष्णवाचा सत्कार, भजनपूजन याच्या परिसरातच तुकोबा लहानाचे मोठे होत होते. पहिली पत्नी रखुमाई दीर्घकाळ आजारी असल्याने तुकोबांचे दुसरे लग्न त्याच्या आईबापानी करून दिले या दुसऱ्या बायकोने, जिजाबाई उर्फ आवलीने तुकोबाच्या चरित्रात बरेच नाव कमाविले आहे तुकोबाचा संसार प्रारंभी तरी आनंदी होता 'मातापिता बंधु सज्जन । घरीं उदड धनधान्य । शरीर आरोग्य लोकात मान्य । एकही उणे असेना' अशा सुस्थितीच्या संसाराच चित्र आकर्षक नव्हत असे कोण म्हणेल ? सांसारिक आपत्ती परंतु देवाला या भक्तास केवळ संसार करू द्यावयाचा नव्हता असे दिसते त्याच्यावर एका- मागून एक असे घाव प्रथम घरून बसण्यास प्रारंभ झाला. 'बाप मेला न कळतां' ही पहिली मोठी आपत्ती थोड्याच दिवसात आई मरण पावली थोरला बंधू सावजी याची पत्नी मरण पावली व तो वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची पहिली बायको अन्नअन्न करून मरण पावली पहिला मुलगा संताजी मरण पावला या घरच्या आघाताने बघून येणारे सासारिक तुकारामबुवा गांगरून गेले असल्यास नवल नाही मूळची वृत्ती अतिशय सात्त्विक, विठ्ठलावर भरवसा मोठा, पण एकामागून एक अशा कोसळणाऱ्या संकटांनी तुकोबांचे मन व्यथित झाले असावे अशा वेळी मनास जपणारी, हळुवारपणे फुंकर घालून दुख हलवे करणारी पत्नी असावी ना ? पण त्यांना हे सुख म्हणावेसे नव्हते सांवलीच्या बाजूने पुष्कळच म्हणण्यासारखे असले तरी, तुकोबानी 'बाईल कर्कशा' म्हणूनच तिचा उल्लेख केलेला आहे 'कर्कश संगती । दुःख उदड फजीती' असाच अनुभव त्यांनी सांगितला आहे बाहेरच्या संकटाचा वर्षाव घरात झालेल्या या पडझडीत भर पडली, ती बाहेरच्या विलक्षण आपत्तीची मग मोठा दुष्काळ पडला, व्यापार बसला, दुकानदारी बुडाली, देणे वाढले, शेतीतील पिके नष्ट झाली व शेवटी दुकानाचे दिवाळे निघाले बऱ्या पुरुषाच्या मनावर अशा आघातानी जा परिणाम होतो, त्याचेही वर्णन तुकारामबुवानी मधून मधून केले आहे आपल्या संसाराच्या व व्यवसायाच्या वाताहतीचे मोठे विदारक चित्र त्यांनी एकदोन ठिकाणी काढलं आहे. 'संसारें जालों अति दुखें दुःखी' येथपासून प्रारंभ करून त्यांनी आपल्यावरील संकटाची मालिकाच निवेदन केलेली आहे 'दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली । लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखें । वेवसाय देखें तुटी येता' किंवा 'बहु पीडिलों संसारें' या शब्दात त्यानी आपल्या फजितीचे वर्णन केले आहे, आणि मग स्वतःचे समाधानही करून घेतलं आहे 'बाईल मेली मुक्त झाली । देवें माया तोडविली', 'बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरे या दुष्काळें पीडा केली' 'बरे झाले देवा बाईक कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये' 'देव भक्तालागीं करूं नेदी संसार' 'स्त्री बाळी गुणवती तीथें गुते आशा । यालागीं कर्कशा पाठी लायी' यासारख्या वचनात क्षणिक उद्वेग किती ? तात्त्विक सिद्धान्ताच भ्रम किती ? हा विचारही एका अभ्यासास उपयुक्त पडण्यासारखा आहे 'येथें सारं भगवंत' संसाराच्या, व्यवसायाच्या या वाताहतीनंतर बुवांच मन लौकिक जीवनातून उठले 'जाला हा वमन संसार', 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' या निश्चयाने तुकोबांच्या आयुष्यास एक नवीन वाट मिळाली सुप्त असलेल्या विठ्ठलभक्तीस जोराची जाग प्राप्त होण्याचा समय प्राप्त झाला.