सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 18, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंलालचावलेले होते याच दर्शनसुखाची गोडी त्यांना अवीट वाटत होती हेच 'सकळ मंगळाचे सार । मूळ सिद्धीचे भांडार' त्यांना वाटत होते याच्या दर्शनाने मनाची अवस्था कशी होऊन जाई ? तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे ' रूपीं गुंतले लोचन । पायीं स्थिरावले मन । देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला । फळो नेदि सुख दुःख । सान हरपली भूक । तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥ विठ्ठलाशी लडिवाळपणा या विठ्ठलाच्या रूपाचा वेध त्यांना निरंतर असे त्याच्या दर्शनसुखासाठी ते उत्सुक असत. त्याच्या अंगाखांद्यावर खेळावया मिळावे म्हणून त्यांची तळमळ असे कधी कळवळून ते या विठाई माउलीला हाक मारतात कधी तिला प्रश्न विचारतात, कधी तिच्यावर रुसतात, कधी प्रेमाने तिच्याशी भांडतात, कधी लडिवाळपणे ते आवतीभोवती वावरतात. कधी तिने आपणाकडे लक्ष द्यावे म्हणून इतरांचे दाखले ते देतात आपल्या मुलाचा सांभाळ कसा करावा, हे काही आईला शिकवावे लागत नाही ती त्याला गोड गोड पदार्थ न मागता देते, त्यास लागलेली भूक तिलाच अगोदर समजते आणि मग ती 'खेळाया गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनीं लावी वळें' त्याच्या दुःखाने ती कष्टी होत असते या मातेप्रमाणेच ही विठाई माउली तुकोबांना वाटत होती ते पुन पुन कळवळ्याने म्हणतात, 'पांडुरंगे ये यो पांडुरंगे । जिवाचे जीवलगे ये यो पांडुरंगे । भक्ताच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आवरणूपी कारणे जन्म दाहा घेतले' आणि मग आता माझ्यासाठी तू का येत नाहीस असा त्यांचा प्रश्न असे. 'मायें मोकलिले कोठें जावे बाळें?'