सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 258, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२२२ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- जगातील सर्व योगी लोकांना स्वतःच्या ठिकाणी जागे असा असे सांगत असतात. १ हा जगन्नाथ ईश्वर स्वतःच जाणणारा असल्याने त्याच्या ठिकाणी काही भाव ठेवावा. २ तोच सर्व क्षेत्राचा पालक असल्याने त्याचीच पूजा करावी. ३ फुले, फळे, पाणी, पान वगैरे घेऊन त्याचीच पूजा करावी ४ मनुष्यदेहाच्या शहरास फार दिवसांनी या योग्याची फेरी आलेली आहे. ५ आपल्या मस्तकावर लौकिक संसाराचा भार कुणीही घेऊ नये. धर्माने वागणे हेच जीविताचे सार आहे. ६ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हास हे दान मागत आहे. ते अनन्य- भावाने मला द्यावे. ७ विवरणः-येथून पुढचे अभंग असेच विरगोळ विषयावर लोकाभिमुख होऊन रूपकाच्या आश्रयाने लिहिलेले आहेत. जोगी, सरवदा, मुढा, डोईफोडा, मलग, दरवेस, गोंधळ, सोंगा, वाघ्या, दसरा इत्यादी नावांनी भारुडाच्या सदरात येतील असे हे अभंग ह्या वेळेच्या समाजात निरनिराळ्या वेषात वावरणाऱ्या व बहुजन समाजास सांस्कृतिक व पारमार्थिक विचाराची जाग देणाऱ्या व लोकरंजनाने काम करणाऱ्या काही लोकांचे हे शब्दचित्र मनोरंजक व उद्बोधक असे आहे या अभंगात योगी अथवा जोगी माणसाचा रूपकात्मक उल्लेख आहे. जोगी हे शंकराचे उपासक कानफाटे असेही यांना म्हणतात अंगाला विभूती, हातात भिक्षापात्र, त्रिशूल, काखेत झोळी किक्रियावर गोपीचंद- मैनावतीचे गाणे अशा थाटात हे लोक अजूनही हिंडताना दिसतात याची परंपरा धर्मनाथापासून सांगतात. या योगी अथवा जोगी लोकांचा संप्रदाय प्रसिद्ध नाथपंथाशीही संबंधित आहे आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ (ज्ञानेश्वरी ) ही परंपरा भागवतधर्माशी निगडित अशीच आहे शिवोपासक नाथपंथाचे पुढे मजेदार रूपान्तर विठ्ठलभक्तीत होऊन ऐक्याचा एक नवा आदर्श निर्माण झालेला दिसतो या अभंगात जागल्या जगदेवाची पूजा पत्र, फल, फूल, पाणी यांनी करावी असे सांगितले आहे याचा संदर्भ भगवद्गीतेमधील 'पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ' या ओळीची आहे हे स्पष्ट आहे सरवदा-अभंग १ ४३७ एका गा ए भाई । सरवदा सांगतो कांई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां दाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥ १ ॥ आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरेंच बोले तो जाय । नरकामध्ये अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणायें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ २ ॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन जागें माझें १ म्हणोन । पडिलें खान तया घरी । म्हणोन न म्हणा माझें कांही । निजीं निजा सुखें ठायी यत्न होईल तईं । चोराठायीं विश्वास ॥ ३ ॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधी । पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनायी निश्चिती । परपुरुपीं होय रती । सुखगती ते पावे ॥ ४ ॥ १ माझे चित्त